Walmik Karad Custody: मोठी बातमी! बीड न्यायालयाचा संतोष देशमुख हत्येप्रकरणी 'मकोका' लावलेल्या वाल्मिक कराडला झटका

Santosh Deshmukh Murder Case Hearing : वाल्मिक कराडला सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीकडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
walmik karad
walmik karadSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर अखेर मकोका कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर त्याला बुधवारी (ता.15) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी न्यायालयानं कराडला मोठा झटका देताना संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात नववा आरोपी केलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) जिल्हा व सत्र न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

वाल्मिक कराडला जिल्हा व सत्र न्यायालयानं 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. एसआयटीनं वाल्मिक कराड याला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी कराडच्या समर्थक आणि विरोधक कोर्टाबाहेर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंगळवारी वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर बुधवारी दुपारी बीड कोर्टात (Beed Court) हजर करण्यात आले.या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला.त्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

walmik karad
Anil Deshmukh : फडणवीसांचे गर्व्हनन्स बॅड, माजी गृहमंत्री देशमुखांनी डागली तोफ

संतोष देशमुख यांच्या हत्येदिवशी वाल्मिक कराड यांचे विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती एसआयटीकडून तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सुनावणीवेळी कोर्टात सादर केली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी वाल्मिक कराडला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी कोर्टात वाल्मिक कराडला दहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कराड याच्यावरील सर्वच गुन्ह्याची यादी यावेळी कोर्टात देण्यात आली. कोर्टाने यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संतोष देशमुख हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या वाल्मिक कराड याची 'एसआयटी'ने बीड न्यायालयाकडे दहा दिवसांची कोठडी मागितली. त्यावर आरोपी कराडचे वकील यांनी कोणताही पुरावा नाही. अटकेत असलेल्या इतर आरोपींनी नाव घेतलेले नाही. एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे, आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? याचे पुरावे देखील नाहीत, असा युक्तिवाद केला.

walmik karad
Walmik Karad : वाल्मिक कराडला फर्ग्युसन जवळ ऑफिस खरेदीसाठी मदत करणारी 'ती' महिला कोण?

दरम्यान, मकोका अंतर्गत अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्याला बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडला सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीकडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला आहे. बीड जिल्हा न्यायालयाबाहेर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com