Anil Deshmukh : फडणवीसांचे गर्व्हनन्स बॅड, माजी गृहमंत्री देशमुखांनी डागली तोफ

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहविभाग अपयशी ठरला असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला असल्याचे देशमुखांनी वादाला तोंड फोडले आहे.
Devendra Fadnavis | Anil Deshmukh
Devendra Fadnavis | Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नेहमची आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यांचा एकमेकांवरील आरोपांचा वाद विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चांगलाच रंगला होता. आता गुड गर्व्हनन्स अहवालावरून देशमुखांनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहविभाग अपयशी ठरला असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला असल्याचे देशमुखांनी वादाला तोंड फोडले आहे.

राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. खून, अपहरण, दरोडा, अत्याचार यासारखे गंभीर गुन्हात मोठया प्रामणात वाढ झाली आहे. नुकताच गुड गर्व्हनन्स अहवाल समोर आला असून यात राज्यातील ३२ जिल्हात गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहविभाग अपयशी ठरले असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहविभाग हा सपशेल अपयशी ठरत आहे असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

Devendra Fadnavis | Anil Deshmukh
Nagpur Mahapalika Election: महापालिकेची निवडणूक लढायची की नाही? वयाची पन्नाशी ओलंडलेले काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात

या अहवालात दहा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी न्याय व लोकसुरक्षा (गुन्हेगारी) तसेच सामाजिक विकास या दोन क्षेत्रात सर्वच जिल्हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे एकीकडे ढासळलेले सामाजिक संतुलन आणि त्यातूनच वाढलेल्या गुन्हेगारीचा मुद्दा या अहवालातून प्रकर्षाने पुढे आला आहे. सामाजिक विकासात राज्यातील केवळ तीन जिल्हांनी ५० टक्यांपेक्षा जास्त गुण घेतले. बाकीच्या ३३ जिल्हे हे सामाजिक विकासात नापास झाले आहेत. या गंभीर बाबीकडे राज्यातील गृहविभागाने वेळीच लक्ष देण्याची गजर असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

न्याय व लोकसुरक्षा या क्षेत्राबाबतही या अहवालातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोक सुरक्षा क्षेत्रात महिलांवरील अत्याचार, बालकांवरील अत्याचार, गुन्हांचा छडा लागण्याचे प्रमाण आदी गंभीर बाबीचा आढावा घेण्यात येतो. या न्याय व लोकसुरक्षा या क्षेत्रात राज्यातील केवळ चार जिल्हांनाच ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे.

Devendra Fadnavis | Anil Deshmukh
Patole VS Raut : स्वबळाचा नारा देणाऱ्या राऊतांना नाना पटोलेंनी फटकारले; ‘काँग्रेसला त्यांच्याशी काही...’

बाकीच्या ३२ जिल्ह्यात न्याय व लोक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील यवतमाळ, वाशीम, जळगाव, लातूर, धुळे, सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिव, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या १४ जिल्हांना ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असून सर्वत्र चर्चेत असलेल्या बीड जिल्हा तसेच नाशिक व जालना या तीन जिल्हांना लोक सुरक्षेच्या क्षेत्रात ३० गुणही नाहीत.

गुड गर्व्हनन्स अहवालाचा विचार केला तर राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याचेही अनिल  देशमुख  यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com