Bajrang Sonwane
Bajrang SonwaneSarkarnama

Bajrang Sonwane News : बजरंग सोनवणे म्हणतात फेरमतदान घ्या; बीडमध्ये नेमका गोंधळ काय?

Beed Lok Sabha Constituency : सोनवणेंनी निवडणूक आयोगाकडे 7 मे रोजीच परळी व इतर विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर इनकॅमेरा मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत पुन्हा 9 मे रोजी त्यांनी आयोगाला स्मरणपत्र दिले होते.

Beed Political News : राज्यातील चौथ्या टप्प्यातील बीड मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे विरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे अशी तगडी लढत होत आहे. या मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १३) मतदान पार पडले. बीड लोकसभेसाठी ६३.९९ टक्के मतदान झाले. मात्र काही मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप सोनवणेंनी केला आहे. त्यामुळे त्यांनी इनकॅमेरा फेरमतदान घ्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली.

सोनवणेंनी निवडणूक आयोगाकडे Election Commission 7 मे रोजीच परळी व इतर विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर इनकॅमेरा मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत पुन्हा 9 मे रोजी त्यांनी आयोगाला स्मरणपत्र दिले होते. त्यावर मात्र प्रशासनाकडून कुठलाही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा दावा सोनवणेंनी करत तक्रारी दाखल केली आहे.

सोनवणेंनी Bajrang Sonwane, परळीतील इंजेगाव, सारडगांव, धर्मापूरी, डिरगस, नाथ्रा, कौडगाव, साबळा, जिरेवाडी, वालेवाडी व कन्हेरवाडी गावातील बुथ क्रमांक १८८, १८९, १३२, १६१, आणि केजमधील देवगाव, लाडेगाव, माजलगाव येथील गोविंदवाडी, धारुरमधील सोनीमोहा, पिंपरवाडा, मैंदवाडी व चाडगांव, आष्टीतील वाली व वाघीरा या गावांतील बुथ ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा आरोप बजरंग सोनवणेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bajrang Sonwane
Heena Gavit : ऐन मतदानादिवशी हिना गावीत यांचा मोबाईल हॅक; काँग्रेसवर गंभीर आरोप

बोगस मतदानाबद्दल आपण कायम जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे मोबाईलद्वारे विनंती केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष करून ते संबंधित ठिकाणी फिरकले नाहीत, असा आरोप बजरंग सोनवणेंनी केला आहे. धर्मापूरी केंद्रावर मुस्लिम व जिरेवाडी केंद्रावर दलित मतदारांना मतदान करू दिले नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी तक्रारी केला आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रांवर इनकॅमेरा फेरमतदान घ्यावे, अशी मागणी सोनवणेंनी लावून धरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Bajrang Sonwane
Ghatkopar Hoarding Collapses : घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना,होर्डिंग कोसळलं! 3 जणांचा मृत्यू, 62 जखमी; CM शिंदेंचा मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com