Latur Political News : अजित पवार गटाच्या संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमात वाजली 'तुतारी'

State level wrestling tournament in Udgir : राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांचे तुतारी वाजवून स्वागत ही नेहमीचीच बाब. पण अजित पवारांच्या मंत्र्यांचे स्वागत तुतारी वाजवून केले.
Sanjay Bansode
Sanjay BansodeSarkarnama

- सचिन वनशेट्टे

Latur News : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत फूट पडली. ते सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घड्याळही विधासनसभा अध्यक्षांच्या निकालाने अजित पवार गटाला मिळाले. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नवे नाव आणि तुतारी हे चिन्हही मिळाले.

राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांचे तुतारी वाजवून स्वागत ही नेहमीचीच बाब. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीसाठी तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांच्या मंत्र्यांचे स्वागत हीच तुतारी वाजवून केले जात असेल तर मात्र त्याची चर्चा झाली नाही तर नवलचं.

उदगीर (Udgir) शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर दिवंगत खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सांयकाळी स्पर्धेचे उद्घाटनावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आगमन होताच तुतारी वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. तेव्हा क्षणभर बनसोडेही चकीत झाले, त्यांच्या समर्थकांच्याही भुवया उंचावल्या.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे स्वागत तुतारी वाजवून झाल्याने एका अर्थाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांच्या पक्षाचा प्रचार झाल्याची चर्चा या निमित्ताने कार्यक्रमस्थळी रंगली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निवडणुक आयोगाने तुतारी वाजवणारा माणुस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नवे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहचवण्याची मोहिम स्वतः सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार समर्थकांनी हाती घेतली आहे.

Sanjay Bansode
Shinde group politics : मुख्यमंत्री - नानांच्या साताऱ्यातील नौका विहाराने राजकीय 'तरंग'

मराठवाड्यात या भागात एरव्ही कुठल्याही कार्यक्रमात तुतारी वाजवली जात नाही. मात्र कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकाने स्वागतासाठी खास तुतारी वाजवल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तुतारीला प्रसिद्धी मिळाली. उदगीर मतदारसंघ शरद पवार यांच्या विचाराला मानणारा असल्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी निवडणूक जिंकली होती. सध्या ते अजित पवार यांची साथ देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्तेत सहभागी होऊन त्यांना मंत्रिपदाची लाॅटरीही लागली. सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत. कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मतदारसंघात बॅनरबाजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सुरू आहे. मात्र, यात चर्चा झाली ती 'तुतारी'चीच. या प्रकारामुळे कदाचित यापुढे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही कार्यक्रमात तुतारी वाजवू नये, असे फर्मान निघाल्यास नवलं वाटू नये.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Bansode
Sanjay Raut : ...यामध्ये मोदी, शहांचा नवीन डाव! निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरुन राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com