Beed Lok Sabha Election 2024
Beed Lok Sabha Election 2024 Sarkarnama

Beed Lok Sabha Election 2024 : प्रचारात झोकून देणाऱ्या क्षीरसागर दाम्पत्याला 'फळ' मिळणार; मुंडे भावंडांकडून संकेत!

Pankaja Munde News : यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात बंड करत धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले.

Beed News : बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव व लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रासपसह महायुतीतील घटक पक्षांचे नेते प्रचारात उतरले आहेत. बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर महिनाभरापासून जीव ओतून प्रचार करत आहेत. डॉक्टर क्षीरसागर दाम्पत्याने उमेदवार पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात मुंडे भावंडांनी त्यांना विधानसभेचा क्ल्यू देऊन टाकला. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद लाभले. यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात बंड करत धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले. धनंजय मुंडे यांनी देखील राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून डॉ. क्षीरसागर यांना विकास निधीसाठी हात ढिल्ला सोडला. दरम्यान, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी डॉ. सारिका व डॉ. योगेश क्षीरसागर दाम्पत्य प्रयत्न करत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी विभागीय नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजनही धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दाम्पत्याने केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांचे जाहीर कौतुक केले. त्यानंतर या दाम्पत्याने सर्कलनिहाय मेळावेही घेतले. शु्क्रवारी बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी विजयी संकल्प मेळावा घेतला. मेळाव्यात समाजातील विविध घटकांतील व्यक्तींसह मोठे शक्ती्प्रदर्शन केले. मेळाव्यातील सर्व घटकांची गर्दी पाहून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे दोघेही खुश झाले. यातील प्रत्येकाने दोन - दोन मते करुन घेतली बीड मतदार संघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना लिड मिळेल. या निकालातूनच विधानसभेचा निकालही ठरलेला असेल, असे जाहीरपणे धनंजय मुंडे म्हणाले.

Beed Lok Sabha Election 2024
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

यावेळी डॉ. सारिका क्षीरसागर म्हणाल्या, "पंकजा मुंडेंच्या रूपाने ही लक्ष्मी बीड (Beed News) जिल्ह्यात यावी. आम्हाला सारे जण विचारतात की, तुम्ही खूप मनावर घेऊन प्रचार करतात, आम्ही सांगतो की, आम्हाला पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्री म्हणून पहायचे आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीत 100 टक्के काम करणार आहोत. पंकजा मुंडे म्हणजे विश्वसनीय आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. क्षीरसागर परिवार आणि मुंडे परिवारांचे नाते घट्ट राहिलेले आहे."

Beed Lok Sabha Election 2024
Chitra Wagh News : चित्रा वाघ यांच्याकडून 'पॉर्न स्टार' म्हणून उल्लेख; अभिनेत्यानं दिला इशारा...
Beed Lok Sabha Election 2024
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले, "आम्ही सर्वांनी मनावर घेतले आहे, पंकजा मुंउे यांचा यांचा विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे हित आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला पंकजा मुंडे यांना निवडून आणायचे आहे. मोदींनी पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) केवळ खासदार करण्यासाठी उमेदवारी दिली नाही तर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे."

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com