Beed Lok Sabha News : पंकजा मुंडे अन् बजरंग सोनावणेंच्या निकालाआधीच बीड पोलिस 'अलर्ट'! काय आहे प्रकरण?

Pankaja Munde Vs Bajrang Sonwane : बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 41 उमेदवार होते. यात प्रामुख्याने भाजपकडून पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे, वंचितकडून अशोक हिंगे आदींचा समावेश आहे.
Pankaja Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात मराठवाडा त्यातल्या त्यात बीड चांगलेच चर्चेत आले. लोकसभेच्या निवडणुकीत देखील हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात होते. प्रचारात आघाडी कुरघोडीचं राजकारण करतानाच भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनी विजयाचा दावाही ठोकला.

बीडची यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. पण भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजकीय वाटचालीला कलाटणी देणारी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्याने या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.पण जसा जसा निकाल जवळ येत तशी उमेदवारांची धडधड वाढू लागली आहे. मात्र, या निवडणुकीला जातीय वळण लागले. त्यामुळे काही ठिकाणी तणावाच्या घटनाही घडल्या.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Adani Project News : विरोध डावलून 'अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट'चं काम सुरू; ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप!

या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या दृष्टीने बीड(Beed News) जिल्हा पोलिस दलाने आतापासूनच विविध घटकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर कारवायानंतर आता यापूर्वी पोलिस दफ्तरी नावांचा सहभाग असणाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 41 उमेदवार होते. यात प्रामुख्याने भाजपकडून(BJP) पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे(Bajrang Sonwane), वंचितकडून अशोक हिंगे आदींचा समावेश आहे. याखेपेची निवडणुक अत्यंत अटीतटीची व चुरशीची झाली. निवडणुकीला जातीय वळणही लागले. मधल्या काळात सोशल मीडियावरील पोस्टवरुन तणावाच्या घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सायबर टिमने कारवायांचा धडाका सुरु केला. कमेंट, पोस्ट करणाऱ्या 191 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, त्यांच्याकडून तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व कमेंट डिलीट केल्या आहेत. आता मतमोजणी जवळ येत असल्याने पोलिस दफ्तरी नोंद असलेल्यांचे रेकॉर्ड शोधून त्यांच्यावरही नोटीसा बजावून कुठलाही अनुचित प्रकार घडवू नका, अशी तंबी पोलिस ठाण्यांमार्फत दिली जात आहे. जिल्ह्यात सोशल मीडियावरील तेढ प्रकरणी 191 जणांना तर पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या 540 जणांना नोटFसा बजावण्यात आल्या आहेत.

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना नोटीस देऊन तसेच प्रत्यक्ष ठाण्यांत बोलावून समज दिली आहे. तसेच ज्यांच्याबाबत पोलिस ठाण्यांत काही नोंद आहे, अशांनाही नोटीसा देऊन समज दिली आहे. सर्व हालचालींवर पोलिस दलाचे लक्ष आहे. सर्वांनी शांतता व सखोला राखावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Pune Accident Porsche : डॉ. तावरे मला दारु आणायला सांगत होते, ससूनमधील वॉर्डबॉयने वाचला तक्रारींचा पाढा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com