Beed Loksabha Constituency : चिमुकल्याने बजरंग सोनवणेंना दिला पैशांचा 'गल्ला', तर महिलांनी काढली रांगोळीतून 'तुतारी'

Bajrang Sonawane Vs Pankaja Munde : सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार स्थितीत आली आहे.
Bajrang Sonawane
Bajrang SonawaneSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : बीड लोकसभा मतदार संघाची निवडणुक रंगतदार होत आहे. महायुतीकडून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार स्थितीत आली आहे.

भाजपाकडे केंद्र व राज्यातील सत्तेसह मंत्री, आमदार, खासदार अशी नेत्यांची फौज आहे. तर, महाविकास आघाडीकडे ताकदीच्या नेत्यांची उणीव आहे. मात्र, उमेदवार बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane) यांच्या प्रचार दौऱ्याला सामान्यांचा प्रतिसाद मिळत आहे. एका चिमुकल्याने सायकल घेण्यसाठी साठविलेल्या पैशांचा गल्लाच त्यांना निवडणूक प्रचारासाठी सुपूर्द केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bajrang Sonawane
Beed Loksabha election : पंकजा मुंडेंसाठी आमदार मुंदडांचे अंबाजोगाईत 'डोअर टू डोअर'

भाजपच्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यातील लोकसभेची निवडणूक रंगतदार होत आहे. बजरंग सोनवणे यांनी एकट्याने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, पंकजा मुंडे यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीड शहरातून फेरी व मोठी सभा घेत शक्तीप्रदर्शन केले. मास लिडर अशी ओळख असलेल्या खुद्द पंकजा मुंडेंसह पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजप आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, रमेशराव आडसकर, राजेंद्र मस्के, बाबूराव पोटभरें, डॉ. योगेश क्षीरसागरसह महायुतीतील इतर पक्षांच्या नेत्यांची फळी भाजपचा प्रचार करत आहे.

बजरंग सोनवणे यांच्याकडे केवळ पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर एकमेव आमदार आहेत. तर, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यासह काही माजी आमदार व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे प्रचाराची मूळ भिस्त बजरंग सोनवणे यांच्याच खांद्यावर आहे. तर, त्यांच्याही दौऱ्याला सामान्यांतून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महायुतीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आष्टीत विधानसभा मतदार संघात भाजपचे सुरेश धस, राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे या दोन आमदारांसह भाजपचे माजी आमदार भिमराव धोंडे भाजपच्या(BJP) उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी कार्यकर्ता मेळावे, सभा, बैठका घेत आहेत.

Bajrang Sonawane
Latur Loksabha Constituency : चिखलीकरसाहेब, मला गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून द्या; श्रृंगारेंची साद

विशेष म्हणजे याच मतदार संघात बजरंग सोनवणे यांच्या दौऱ्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. सायकल घेण्यासाठी चिमुकल्याने पैसे जमा केलेला पैशांचा गल्ला उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडे निवडणूक प्रचारासाठी सुपूर्द केला. तुम्ही निवडून आल्यानंतर सायकल घेईन, अशी भावना आष्टी तालुक्यातील तागडखेल गावातील सहावीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा आयान शौकत पठाण या चिमुकल्याने व्यक्त केली. शाळेला जाण्यासाठी सायकल घेण्यासाठी त्याने पैसे जमिविले होते.

साहेबराव दरेकर, राम खाडे, उद्धव दरेकर, डॉ. महेश नाथ, अमोल तरटे, अण्णासाहेब चौधरी, सुनील नाथ, अशोक मस्के यांच्यासह बजरंग सोनवणे या गावात पोहचताच आयान पठाण याने घरात पळत गेला व पैशांचा गल्ला त्यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, गेवराई मतदार संघातही बजरंग सोनवणेंच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळताना दिसतआहे. बैलगाडीतून, दुचाकीवरून फेरी आणि मिरवणूका काढल्या गेल्या. महिलांनी घरासमोर रांगोळीतून ‘तुतारी’ हे चिन्ह रेखाटून बजरंग सोनवणेंचा प्रचार केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com