Beed Loksabha election : पंकजा मुंडेंसाठी आमदार मुंदडांचे अंबाजोगाईत 'डोअर टू डोअर'

Ambejogai City अंबाजोगाई हे केज मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेले शहर आहे. या शहरात यापूर्वीच्या सर्व लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादी आघाडीवर राहीलेली आहे.
Namita Mundada In Ambejaogai  campaign
Namita Mundada In Ambejaogai campaignsarkarnama
Published on
Updated on

Beed News : महायुतीतील भाजपच्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांसह शिवसा व महायुतीतील इतर घटक पक्षांचे नेत्यांनी प्रचारात झोकून दिले आहे. केजच्या आमदार नमिता मुंदडा व त्यांचे पती अक्षय मुंदडा यांनी आता अंबाजोगाईत 'डोअर टु डोअर' अभियान हाती घेतले आहे. विरोधातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे केज मतदार संघातील आहेत.

आपल्या होमपिचमध्ये विरोधी उमेदवार सोनवणेंना आघाडी भेटू नये यासाठी मुंदडांनी सभा, बैठकांसह अंबाजोगाई शहरात ‘डोअर टु डोअर’ फॉर्म्युला अवलंबिला आहे. मागच्या आठवडाभरापासून आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा अंबाजोगाई शहरातील प्रत्येक घराघरांत जाऊन भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार करत आहेत.

अंबाजोगाई हे केज मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेले शहर आहे. या शहरात यापूर्वीच्या सर्व लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादी आघाडीवर राहिलेली आहे. याखेपेला भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आघाडी मिळावी, यासाठी घराघरांत जाऊन प्रचाराचे तंत्र मुंदडांनी अवलंबले आहे. पंकजा मुंडे यांचा जाहीरनामा प्रत्येकाच्या हाती सोपवून मतदान करण्याचे आवाहन नमिता मुंदडा करत आहेत.

Namita Mundada In Ambejaogai  campaign
Beed Lok Sabha: बहिणीला पाडण्याची पालकमंत्र्यांना घाई; सोनवणेंचा मुंडेंवर हल्लाबोल

शहरातील गांधीनगर, गवळीपुरा,मिलिंद नगर,मोची गल्ली, पंचशील नगर,खुरेशी गल्ली, कैकाड गल्ली सदर बाजार येथे प्रचार फेरी काढून प्रचार पत्रकांचे वितरण केले. तसेच शहरातील गुरूवार पेठ, खंडोबा मंदिर परिसर,मदिना चौक, पोस्ट ऑफिस रोड, गुरूवार पेठ,दुर्गा माता रोड गांधीनगर,ढोर गल्ली या परिसरात कार्यकर्त्यांसमवेत प्रचार फेरी काढून प्रचार पत्रके वितरित करत आमदार नमिताताईंनी मतदारांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थिर आणि खंबीर मोदी सरकारच्या काळात देश वेगाने प्रगती करत असून महासत्ता होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याचे सूतोवाच मोदी सरकारने केले आहे. उज्ज्वला योजनेतून कोट्यवधी महिलांना सिलेंडर देण्यात आले आहेत.

Namita Mundada In Ambejaogai  campaign
Karale Guruji On Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावरून कराळे गुरूजींचे टोमणे...

तर, लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यासोबतच शेतकरी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी असे सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या दीर्घकालीन उज्वल भविष्यासाठी मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा पटवून देत आहेत.

Edited By : Umesh Bambare

Namita Mundada In Ambejaogai  campaign
Namita Mundada: मतदारसंघातील प्रश्नांसाठी आमदार नमिता मुंदडा चिमुकलीसह सभागृहात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com