Ratnagiri Sindhudurg Loksabha Update: CM शिंदेंनी किरण सामंतांना तातडीने मुंबईला बोलावलं; मोठा निर्णय होणार?

Loksabha Election 2024 : भाजपने नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर केल्यास किरण सामंत काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Eknath Shinde - Kiran Samant
Eknath Shinde - Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून इच्छुक आहेत.त्यांच्या समर्थकांनी किरण सामंत यांच्या प्रचारास सुरुवातही केली होती. मात्र,महायुतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आल्याची माहिती समोर आली.तसेच या जागेवर भाजपकडून नारायण राणे यांचं नावही पुढे आले.पण आता रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.

शिवसेनेच्या किरण सामंतांनी रत्नागिरी - सिंधुदुर्गच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने आणि खुद्द भाजप नेते नारायण राणेंनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता.तसेच महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध् महायुतीकडून नारायण राणे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.पण या मतदारसंघाबाबत जोरदार हालचाली सुरु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने किरण सामंतांना मुंबईत बोलावून घेतले आहे.

Eknath Shinde - Kiran Samant
Loksabha Election 2024 : काँग्रेसने जाहीर केली चौथी यादी; जालना, धुळे मतदारसंघातील उमेदवारांची केली घोषणा!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महायुतीतील शिवसेना आणि भाजपने दावा सांगितल्याने तेढ निर्माण झाला आहे.दोन्ही पक्ष या जागेवरील दावा सोडण्यास तयार नसल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार, याकडे लक्ष आहे.महायुतीत काही जागांचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या नाकीनऊ आले आहे.

त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपने दावा सांगितला आहे. या ठिकाणी भाजप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.कोणत्याही क्षणी भाजप राणेंची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत (Kiran Samant) यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.या सगळ्या घडामोडींनंतर शिंदे रत्नागिरी- सिंधुदुर्ग हे किरण सामंत यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल. भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर केल्यास किरण सामंत काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार किरण सामंत हे बुधवारी (ता.10) पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांनी व्हॉटस ॲपला ठेवलेले स्टेटसने राजकीय एकच खळबळ उडाली. लोकसभेला उमेदवार ठरल्यानंतर त्यात मिठाचा खडा आढळला तर विधानसभेला मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ त्यांनी स्टेटसला ठेवला. पण या स्टेटसद्वारे त्यांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे, किंवा त्यांची पुढची राजकीय दिशा काय असणार यावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Eknath Shinde - Kiran Samant
Satara Loksabha : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com