Beed Loksabha Election: तुतारीवाल्याकडून बीडचा विकास होणार नाही, ते केवळ..' ; धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर आरोप!

Dhananjay Munde Vs Bajrang Sonwane : ...म्हणजे निवडणूक लढवायला ओबीसी अन् इकडे मात्र मराठा समाजाची मते मागतात, असंही धनंजय मुंडें म्हणाले आहेत.
Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Dhananjay Munde, Bajrang SonwaneSarkarnama

Loksabha Election 2024 News : 'तुतारीवाल्याकडून बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही. ते केवळ मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. आंदोलनात कवडीचेही योगदान नसणाऱ्या बजरंग सोनवणेंनी प्रमाणपत्राचा वापर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत ओबीसी उमेदवार म्हणून फॉर्म भरण्यासाठी केला. म्हणजे निवडणूक लढवायला ओबीसी अन् इकडे मात्र मराठा समाजाची मते मागतात.' असा आरोप पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर केला.

तसेच, सुज्ञ मतदार असल्या जातीपातीच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत, असा विश्वासही यावेळी धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) व्यक्त केला.

माजलगाव येथे जय महेश कारखान्यावर कर्मचार्‍यांशी धनंजय मुंडेंनी संवाद साधला. कारखान्याचे बालू जाधव, कार्यकारी संचालक प्रसाद बाबू, पुरूषोत्तम, लक्ष्मण पौळ, राजाभाऊ पौळ यांची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Raosaheb Danve News : ...जेव्हा रावसाहेब दानवे भरस्टेजवरुन काढतात सेल्फी!

धनंजय मुंडे म्हणाले, 'आपल्याला जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासाची ब्ल्यू प्रिंट पाहावी लागेल. इथली माती सुपिक आहे. परंतु इथे शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्‍या काळात कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आपल्याला नाशिकच्या धरणात आणायचे आहे. तिथून ते जायकवाडी धरणात तिथून ते माजलगाव धरणात अन् पुढे परळीच्या तांदळवाडी येथे नव्याने होणार्‍या तलावात नेण्यात येणार आहे.'

या प्रकल्पामुळे सुमारे 42 टीएमसी पाणी जिल्ह्याला मिळणार आहे. हा प्रकल्प पुर्णत्वाला गेला तर जिल्ह्याची 8 लाख हेक्टर जिरायती शेतीपैकी 7 लाख हेक्टर शेती बागायती होणार आहे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार हवे. अन् जिल्ह्याचा खासदार देखील त्याच विचाराचा असायला हवा, आपल्या तुतारीवाल्या उमेदवाराला जिल्ह्याची भौगोलिक स्थिती तरी माहिती आहे का? असे देखील मुंडे म्हणाले.

याचबरोबर 'आपल्या शेजारच्या लातुरला रेल्वे कोच बनवण्याची फॅक्ट्री मंजूर झाली. तिचे काम देखील युध्द पातळीवर सुरू आहे. त्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसाच एखादा मोठा रोजगार आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी पंकजा मुंडे(Pankaja Munde) केंद्रात प्रयत्न करतील आणि तसा मोठा प्रकल्प मोदीच जिल्ह्याला देवू शकतात.' असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Raosaheb Danve News : "अर्जुन खोतकर हे सून, तर मी सासू", रावसाहेब दानवेंची जोरदार फटकेबाजी

'गेल्या अनेक वर्षापासून आपण रेल्वेने येणार म्हणत आहोत. सध्या ही रेल्वे पाटोदा तालुक्यातील अंमळनेरपर्यंत आलेली आहे. पुढच्या वर्षभरात ती परळीपर्यंत येईल. आपल्याला नुसती रेल्वे पाहीजे नाही, तर वंदे भारत एक्स्प्रेस बीड येथून बंगळुरू, हैद्राबाद, मुंबईला धावायला हवी, यासाठी प्रयत्न करायचे आहेत.', असे देखील मुुंडे म्हणाले.

आपल्याला विकासाचे राजकारण करावे लागेल. जात, पात, धर्म यामध्ये कोणाचेही भले होणार नाही. तुतारीने जिल्ह्याचा विकास अजिबात होणार नाही. कोणाच्याही भुलथापांना विनाकारण बळी पडू नका, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com