Beed Corruption News : बीड महावितरणमध्ये 13 कोटींचा घोटाळा! 6 अभियंते निलंबित; धक्कादायक माहिती समोर?

Beed electricity department corruption case : बीड जिल्ह्यात महावितरणला 13 कोटी रुपयांचा आर्थिक चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी 6 अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Beed electricity department corruption case
Beed electricity department corruption caseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News : बीड जिल्ह्यातील महावितरणच्या कामांची कंत्राटे वाटप आणि कामांमधील तब्बल १३ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात महावितरण्चाया सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या दणक्याने महावितरणच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या घोटाळ्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दैनिक 'सकाळ'ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता तसेच दोन सहाय्यक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

​यापूर्वी महावितरणच्या बीड विभागीय कार्यालयात देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली १३.७० कोटी रुपयांच्या निधीवर कंत्राटदारांशी हातमिळवणी करून बोगस बिले व कमिशनबाजीतून कसा डल्ला मारला गेला, याचा पर्दाफाश 'सकाळ'ने केला होता. मुंबईतील विशेष चौकशी समितीने केलेल्या झाडाझडती आणि स्थळ पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर अखेर अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत आणि कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांच्यासह गेवराई तालुक्यातील ४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Beed electricity department corruption case
Ashok Chavan Audio Clip: "तुमचा अख्खा नांदेड जिल्हा माझ्या वाकड्यात..! चव्हाणांसह 5 आमदारांच्या हत्येचा कट? खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर; ऐका नेमकं काय घडलं

घोटाळ्याच्या चौकशी अहवालात जबाबदार धरण्यात आलेल्या प्रेमसिंग राजपूत (अधीक्षक अभियंता, बीड),​सुबोध डोंगरे (कार्यकारी अभियंता, बीड), ​श्याम मोरे (उपकार्यकारी अभियंता, गेवराई), ​शाम कुंभार ( सहाय्यक अभियंता, उमापूर) ​चंद्रकांत प्रधान (सहाय्यक अभियंता, तलवाडा), ​महेंद्र गुंजाळ (कनिष्ठ अभियंता, सिरसदेवी) या सहा अधिकाराऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर मूळ तक्रारकर्ते तथा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ही कारवाई केवळ वरवरची असून एकाच तालुक्यापुरती मर्यादित आहे. पाटोदा, शिरूर कासारसह जिल्ह्यातील इतर भागांतही असाच गैरप्रकार झाला असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या संपूर्ण महाघोटाळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आणि दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Beed electricity department corruption case
OBC Government Decisions : OBC समाजासाठी मोठा निर्णय! विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार, तब्बल 6,840 कोटींची शिफारस; मंत्री बावनकुळेंची घोषणा!

या कारवाईनंतर एकट्या गेवराईपुरती कारवाई न ठेवता पाटोदा, शिरूर आणि अन्य तालुक्यांतील कामांचीही सखोल चौकशी होणार का? तसेच केवळ निलंबनावर न थांबता या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून वसुली केली जाणार का? याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.