Beed Mahayuti Politics: विधानसभेसाठी महायुतीत मित्रपक्षांची आडकाठी तर पक्षात गटबाजी

Beed Politics : बीड मतदारसंघातून शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी वर्षभरापूर्वीच निवडणुक लढविण्याची घोषणा केली. लोकसभेनंतर जगतापांनी तयारीचा वेग वाढवताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘ज्यांचा आमदार त्या पक्षाची जागा’ असे समीकरण मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मधील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या.
Anil Jagtap - Eknath Shinde.jpg
Anil Jagtap - Eknath Shinde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : महायुतीत पूर्वी बीडची एकमेव जागा शिवसेनेला होता. आता राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीही दोन झाल्या. त्यामुळे महायुतीत देखील स्पर्धकांची संख्या वाढल्याने महायुतीतील शिवसेनेच्या बीडच्या जागेवर मित्रपक्ष राष्ट्रवादीचा डोळा आहे. इकडे मित्रपक्ष आडकाठी घालत असताना आता पक्षातही गटबाजीचे चित्र दिसत आहे.

बीड मतदारसंघातून शिवसेनेकडून (Shivsena) जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी वर्षभरापूर्वीच निवडणुक लढविण्याची घोषणा केली. लोकसभेनंतर जगतापांनी तयारीचा वेग वाढवताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘ज्यांचा आमदार त्या पक्षाची जागा’ असे समीकरण मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मधील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या.

तरीही पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने जिल्ह्यात एखादी जागा तरी पक्षाला सोडवून घेतीलच असा विश्‍वास शिवसैनिकांना आहे. मात्र, याचवेळी आता पक्षात गटबाजीला सुरुवात झाली आहे.

मंत्रालय पातळीवर उठबस असणारे व विशेषत: शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी (Eknath Shinde) निगडीत असलेल्या बाजीराव चव्हाण यांनाही आता विधानसभा निवडणुक लढविण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी परवाच पालवण येथे ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण केले. मात्र, या कार्यक्रमाला त्यांनी पक्षाचे दोन्ही जिल्हा ्रपमुख अनिल जगताप व सचिन मुळूक यांना टाळल्याने पक्षात गटबाजीची चर्चा सुरु झाली आहे

Anil Jagtap - Eknath Shinde.jpg
Asaram Bapu Parole News: ...अखेर 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच आसाराम बापूंना न्यायालयाकडून जामीन मंजूर, पुण्यात येणार

पक्षफुटीनंतर अनिल जगताप यांना मुख्यमंत्रयांपर्यंत पोचविण्यात आणि अनिल जगतापच पक्षाला विधानसभेसाठी तगडा चेहरा असल्याचे मांडण्यात बाजीराव चव्हाणच पुढे होते. मात्र, आता त्यांनीही विधानसभेच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. अनिल जगताप यांनी यापूर्वी पक्षाकडून निवडणुक लढविलेली असून ते २० वर्षांहून अधिक काळ जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचाही संपर्क दांडगा आहे.

तर, बाजीराव चव्हाण अलिकडच्या काळात मंत्रालय पातळीवर संपर्कात पुढे असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांनी असंख्य रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे. विविध मंत्रयांशी असलेल्या संबंधांतून त्यांनी समर्थकांना निधीही मिळवून दिलेला आहे. आता जगताप यांच्या तयारीच्या वाटेत चव्हाण यांच्या इच्छेमुळे नवा स्पीडब्रेकर येतो की काय, अशी शिवसैनिकांची भावना होत आहे.

Anil Jagtap - Eknath Shinde.jpg
Nana Bhangire News : नाना नॉट रिचेबल; अन् नीलमताई म्हणतात 'ऑल इज वेल' !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com