Sanjay Raut : महिन्याच्या ब्रेकनंतर 'मराठी बाणा' पुन्हा मैदानात; संजय राऊतांचा मोठा दावा: शिंदे गटावर शाह यांची 'सर्जिकल स्ट्राईक'?

Sanjay Raut Claims Amit Shah’s ‘Surgical Strike’ eknath shinde Shivsena : महिन्याच्या ब्रेकनंतर ‘मराठी बाणा’ पुन्हा मैदानात. संजय राऊत यांचा दावा, अमित शाह शिंदे गटावर करणार राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडी जाणून घ्या.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी महिनाभराच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर तोफ धडाडली आहे. राऊत काही दिवसांपासून आजारावर उपचार घेत असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया देत पुन्हा ‘मराठी बाणा’ दाखवला आहे.

राऊत यांनी सुरुवातीला आपल्या तब्येतीची माहिती देताना, “उद्धव ठाकरे माझी काळजी घेत आहेत. उपचार कठीण आहेत पण प्रकृती सुधारत आहे. डिसेंबरनंतर पूर्ण बरा होईल,” असे सांगितले. मात्र, तब्येतीचा विषय संपताच त्यांनी शिंदे गट, भाजप आणि दिल्ली नेतृत्वावर थेट निशाणा साधला.

Sanjay Raut
CM Devendra Fadnavis : आयोगाच्या निवडणूक स्थगिती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची तीव्र नाराजी; म्हणाले,'ही मोठी..!'

यावेळी त्यांनी शिंदे गटावर सर्वात मोठा हल्ला चढवत, “शिंदे गटाचा कोथळा अमित शाहाच बाहेर काढणार. ज्यांनी शिवसेना फोडली तीच वेळ आता त्यांच्यावर येणार आहे,” असा दावा केला. तसेच, शिंदे गटातील किमान 35 आमदार फुटणार असल्याचाही गौप्यस्फोट केला.

राजकीय समीकरणांबद्दल बोलताना त्यांनी ठाकरे आणि मनसे यांच्याविषयी विधान केले आहे. "उद्धव ठाकरे–राज ठाकरे यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी तयार केलेली PPT उद्धव ठाकरेंना आवडली. दोन्ही भावांची एकजूट मुंबईतील भाजप आणि अदानी गटाच्या दबावाला उत्तर देईल,” असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Government Holiday : 'या' तारखेला सार्वजनिक सुट्टी! जिल्हाधिकाऱ्यांनी केली महत्त्वाची घोषणा, नागरिकांना दिलासा!

राऊत यांनी काँग्रेससोबतही महाविकास आघाडीच्या चौकटीत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. "राज ठाकरे सोबत आले तर मुंबईत भाजपचा पराभव अटळ आहे. मुंबईचा शत्रू भाजप आहे आणि अदानीला दिलेले शहर वाचवण्यासाठी ठाकरे–मनसे एकत्र येणे ही काळाची गरज आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com