Beed News : बीडच्या निकालाने समीकरण बदलले; पंडितांच्या सिमोल्लंघनाचा पाया बनला अधिक घट्ट

Beed Municipal Election : बीड नगरपालिका निवडणूक निकालामुळे राजकीय समीकरणे बदलली असून, विजयसिंह पंडितांची बीडमध्ये ठोस एंट्री झाली. क्षीरसागरांचे वर्चस्व संपत राष्ट्रवादीची पकड मजबूत झाली.
NCP leader Vijay Singh Pandit addressing the media after the Beed municipal election results that shifted political power and weakened the Kshirsagar camp.
NCP leader Vijay Singh Pandit addressing the media after the Beed municipal election results that shifted political power and weakened the Kshirsagar camp.sarkarnama
Published on
Updated on

Local Body Election Result News : क्षीरसागर व पंडित दोघेही शहराचे मूळ रहिवाशी नसले तरी अनेक वर्षांपासून बीडकर. पण, बीडच्या राजकारणात पंडितांचा कधी थेट हस्तक्षेप झाला नाही. अनेकदा एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या क्षीरसागर - पंडितांनी काही निवडणुकांत एकमेकांना मदतही केली. अनेक वर्षे बीडची सत्ता क्षीरसागरांची आणि क्षीरसागरांच्या घरात फुटीनंतरही बीडचे राजकारण क्षीरसागरांभोवतीच फिरलेले दिसले. पण, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने समिकरणे बदलली आणि क्षीरसागरांच्या भूमिकेमुळे पंडितांना बीडमध्ये वाव मिळाला.

गेवराईचे पार्सल पॅकींग करुन अजित पवारांकडे पाठविण्याच्या डॉ. योगेश क्षीरसागरांच्या आव्हानावर बीडच्या सकारात्मक निकालानंतर विजयसिंह पंडितांनीही गोदाकाठच्या वाघाचे बीडमध्ये सिमोल्लंघन झाले असून निकालातून रावण दहन केल्याचा टोला लगावला. एकूणच ही निवडणुक पंडितांना बीडमध्ये एंट्री करण्यास मदत आणि हा निकाल त्यांचे पाय बीडमध्ये घट्ट रोवण्यास हातभार लावणारी ठरली.

नगर पालिका निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार विजयसिंह पंडित यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुक प्रचारात डॉ. योगेश क्षीरसागरांकडून पंडितांवर 'गेवराईचे पार्सल'ला उत्तर देताना 'गोदाकाठच्या वाघाचे बीडमध्ये सिमोल्लंघन' झाल्याचे नमूद करुन नेते अजित पवारांच्या सुचनेमुळे जबाबदारी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, कल्याण आखाडे, फारुक पटेल, शेख निझाम, राजेंद्र राऊत, सुहास पाटील आदींसह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

तत्पुर्वी पंडित यांच्यासह नेत्यांनी अंकुशनगरला जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेटही निकालाबद्दल बरेच काही सांगून जाते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला जनाधार मिळाला. हा भाग याचा तो त्याचा ही काय राजेशाही आहे का? असा सवाल करत बीडला स्वत:ची जहागिरी समजणाऱ्यांना मतदारांनी ऐपत दाखविल्याचा टोलाही पंडितांनी लगावला.

NCP leader Vijay Singh Pandit addressing the media after the Beed municipal election results that shifted political power and weakened the Kshirsagar camp.
Beed Municipal Council News: बीडच्या अंबाजोगाईत आमदारांचे सासरे विजयी; धारुर, परळीत घड्याळाचा गजर, तर गेवराईत कमळ फुलले

आमचा बीडकरांशी संपर्क आणि संबंध पिढीजात पण कधी सिमोल्लंघन केले नव्हते. आता दसराही काढला आणि रावण दहनही केले. भविष्यात शहरातील पाणी, वीज, रस्ते, नाली आदी समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असून अजित पवारांच्या माध्यमातून शहराच्या विकासाचे मॉडेल हाती घेतले जाईल, असे आश्वासन पंडित यांनी यावेळी दिले.

अमर नाईकवाडेच्या पराभवासाठी दोन्ही क्षीरसागरांनी केलेले प्रयत्न सर्वांनी पाहीले. कालच मी नगरसेविकास आणि दिरांच्या उल्लेखावरुन (डॉ. सारिका क्षीरसागरांच्या वक्तव्यावरुन दोन्ही क्षीरसागर) एकत्र असल्याचेही विजयसिंह पंडित म्हणाले. शहरात समस्या तर आहेच. शिवाय पालिका हे सत्ताधाऱ्यांच्या अडवणूकीचे साधन होते. खरेदी व्यवहारांत हस्तक्षेप, फेरफार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

NCP leader Vijay Singh Pandit addressing the media after the Beed municipal election results that shifted political power and weakened the Kshirsagar camp.
Beed Election: बीडमध्ये राष्ट्रवादी-भाजपातील चिखलफेकीत आमदार क्षीरसागर शांतपणे खेळत राहिले; कोणाचं 'पार्सल' पॅक होणार?

मुंडेंनी गुलाल उधळला

धनंजय मुंडे यांच्याबद्दलच्या प्रश्‍नावर पक्षाचे ते मोठे नेते असून त्यांच्यावर पक्षाने टाकलेली परळी व गंगाखेड नगर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी गुलाला उधळून यशस्वी केली, असल्याचे पंडित यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com