

Shivsena-Shivsangram Politics News : बीड नगर पालिकेवरील क्षीरसागरांची सत्ता घालविण्याचे दिवंगत विनायकराव मेटे यांचे स्वप्नं रविवारच्या नगरपालिका निकालाने पूर्ण झाले. तर, परळीत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि बीडमध्ये जिल्हापमुख अनिल जगताप यांच्या खेळ्या यशस्वी ठरल्या. विशेष म्हणजे परळीत शिवसेना 'जायंट किलर' ठरली आणि पक्षाच्या उमेदवाराने माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांना धूळ चारली.
नगरपालिका निवडणुकीत योगेश क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार विजयसिंह पंडित यांनी शिवसेना आणि शिवसंग्रामला साद घातली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी कुठल्याही राजकीय अटी न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेसला मदतीचा हात पुढे केला. बीड शहराचे वाटोळे करणाऱ्या क्षीरसागरांची सत्ता घालविण्यासाठी विनाअट मदत, असे सूत्र त्यांनी मांडले.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना, शिवसंग्राम युतीच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामने प्रयत्नात कोणतीही कसूर सोडली नाही, असे शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योती मेटे म्हणाल्या. यामुळे अनेक वर्षे बीडमधील क्षीरसागरांची सत्ता पालटली, हेच दिवंगत मेटेंचे स्वप्न होते असे त्यांनी सांगितले.
तर, शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी रणनिती आखत महायुतीतून परळीत दोन नगरसेवकांना विजयी केले. संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची क्षमतेमुळे त्यांना मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी परळीत योग्य वाटा दिला. व्यंकटेश शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. तर, जयश्री मुंडे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्या. बीडमध्ये अनिल जगताप यांनी शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी करण्यात यश मिळविले. शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात हातभार लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.