

Beed News : मागच्या 40 वर्षांत एक टर्मला अपात्रतेमुळे डॉ. भारतभूषण क्षीरसागर खुद्द मैदानाबाहेर असल्याने 3 वर्षांसाठी त्यांच्या मर्जीविना बीडचा नगराध्यक्ष झाला. मागच्या वेळी घरातील फुटीनंतरही दोन्ही पदे घरात होती. यावेळी मैदानातील युद्ध हारल्यानंतर डावपेचात विरोधकांना नामोहरम करण्याइतके संख्याबळ असतानाही ही संधी क्षीरसागरांनी दवडली. निवडीच्या काही काळापर्यंत झालेल्या बोलण्यात यश आले नाही.
मागील अनेक वर्ष नगरपालिका-क्षीरसागर असे समिकरणच होते. स्मीता धुत, शिवलाल मुळूक, मंगल मोरे हे तिघे दुसऱ्या पक्षाचे एकेक वर्षांसाठी नगराध्यक्ष झाले. 2011 च्या निवडणुकीत सर्व नेते एकत्र असताना 50 पैकी 49 जागा जिंकण्याची किमया क्षीरसागरांनी केली. मागच्या निवडणुकीत घरातील फुटीनंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष, संदीप क्षीरसागरांचे भाऊ हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष आणि स्विकृत म्हणून डॉ. योगेश क्षीरसागरांची एंट्री झाली.
यावेळी ऐनवेळच्या समीकरणामुळे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी शिवसेना, शिवसंग्रामला सोबत घेत क्षीरसागरांविना नगरपालिका जिंकण्याची किमया केली. पण, त्यानंतर देखील क्षीरसागर बंधूंकडे संख्याबळ होते. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा 1 तसेच डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 15 असे त्यांच्याकडे 28 संख्याबळ होते.
दोन्ही क्षीरसागरांपैकी कोणीही एकाने दुसऱ्याला पाठिंबा देत उपगनगराध्यक्षाच्या निवडीवेळी मैदानात हरविणाऱ्या पंडितांना शह देण्याची संधी होती. मात्र, निकालादिवशी ‘आमदार माझे दीर’ म्हणणाऱ्या क्षीरसागरांना एकीकरणाची वा विरोधकांना नामोहरम करण्याची खेळी करता आली नाही. यासाठी स्ट्रॉंग मध्यस्थी करणाऱ्यांची उणिवही दिसून आली.
भाजपकडून निवडीच्या काही वेळापर्यंत हे प्रयत्न झाले. मागच्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भावाला उपनगराध्यक्ष करण्यासाठी एमआयएम फोडले होते. यावेळी कार्यकर्त्यासाठी त्यांनी ‘भावाला साथ किंवा भावाची साथ’ घेतली असती तर आज निवडीत चित्र वेगळे दिसले असते आणि बीड क्षीरसागर मुक्त करवू पाहणऱ्या विरोधकांनाही शह बसला असता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.