
Marathwada : कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य घरातून आलेल्या दिवंगत विनायक मेटे यांनी राज्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. (Beed News, Marathwada) मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या चळवळीत कायम अग्रेसर आणि आक्रमक असलेल्या मेटे यांनी सामुदायिक विवाह, नशाबंदीसारख्या सामाजिक कामातही पुढाकार घेतला. आता त्यांच्या स्मृती जागवत त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे मैदानात उतरल्या आहेत.
दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांची ३० जुनला षष्टब्दी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्त शिवसंग्रामच्या वतीने जागर स्मृतीचा अभियान हाती घेण्यात आले आहे. या निमित्त शिवसंग्राम टिमसह पायाला भिंगरी लावून डॉ. मेटे गावागावांत जाऊन समर्थकांशी संवाद साधत आहेत. (Beed News) रविवारी या निमित्त त्यांनी शेतात राबणाऱ्या महिलांशी संवाद साधतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात साधारण ३५ वर्षे आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण, आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाची उभारणीचे मुद्दे आंदोलनासह विधीमंडळात कायम लाऊन धरले (Marathwada) यासह मुस्लिम,धनगर आरक्षणाच्या बाबतीतही त्यांनी पुढाकार घेतला. ईडब्ल्यूएस, स्पर्धा परीक्षेतील मराठा तरुणांच्या वयाचा मुद्दा यासाठी विनायक मेटे यांनी गल्ली ते दिल्ली धडका मारल्या.
त्यांचे निधनही मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला जातानाच अपघातात झाले. दरम्यान, ३० जुन रोजी त्यांची षष्ट्यब्दी जयंती साजरी होत आहे. जयंती निमित्त शिवंसग्रामच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही सुरु आहेत. याचाच भाग म्हणून जागर स्मृतीचा अभियान हाती घेतले असून २२ जुनपासून २६ जुनपर्यंत होणाऱ्या अभियानात रोज साधारण २० ते २५ गावांचा दौरा आहे.
शिवसंग्राम कार्यकर्त्यांसह मेटे यांच्या समर्थकांशी डॉ. ज्योती संवाद साधून त्यांच्या स्मृती जागवत ३० जुनला बीड येथे होणाऱ्या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थितीचे आवाहन करत आहेत. याच निमित्त रविवारी दौरा सुरु असताना शेतात काम करणाऱ्या महिलांनी हात दाखवत डॉ. मेटे यांचा ताफा थांबविला. डॉ. मेटेही शेतशिवार तुडवत गेल्या आणि महिलांशी आपुलकीने संवाद साधला. लांबलेला पाऊस, खोळंबलेली पेरणी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.
अनेक ठिकाणी महिला डॉ. ज्योती मेटे यांच्याकडे दिवंगत मेटे यांची आठवण काढतांना दिसत आहेत. त्यांच्या समवेत जेष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, सुहास पाटील, मनोज जाधव, ज्ञानेश्वर कोकाटे, मनिषा कुपकर, मनिषा कोकाटे, संगीता ठोसर, साक्षी हंगे ही टिम आहे. सकाळी आठ पासून सुरु झालेला दौरा रोज २० ते २५ गावे करुन रात्री ११ ला संपतो. दरम्यान, दिवंगत मेटे यांच्यानंतर उघड्यावर पडलेल्या शिवसंग्रामींना आधार कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनात सहाय्यक निबंधक असलेल्या डॉ. ज्योती मेटे यांनी सक्रीय व्हावे, असा आर्जव सुरुवातीलाच मेटे समर्थकांनी केला होता.
त्यांनीही काळाची पावले ओळखत आणि गरज ओळखत आपल्या दु:खावर पांघरुन टाकत जवळच लातूरला बदली करुन घेतली. मुलांचे शिक्षण आणि संसार पाहत त्या वर्षापासून शिवसंग्रामचा गाडाही मोठ्या खंबीरपणे पेलताना दिसत आहेत. शिवसंग्राम कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुख - दु:खात त्या सहभागी होत आहेत. दिवंगत मेटे यांनी सुरु केलेली व्यसनमुक्तीची ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमाची परंपरा त्यांनी यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाने करुन दाखविली. आताही विनायक मेटे यांच्या षष्ट्यब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी राज्यस्तरावरील नेत्यांना निमंत्रण दिल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.