Raosaheb Danve On Rahul Gandhi : परदेशात बदनामी करण्याआधी आजीने लादलेल्या आणीबाणीचा इतिहास तपासा..

Bjp : विश्‍वात भारतीय लोकशाहीचे गुणगाण, पंतप्रधान मोदी यांचे कौतूक होत असतांना काँग्रेसजणांची पोटदुखी वाढली.
Raosaheb Danve On Rahul Gandhi
Raosaheb Danve On Rahul GandhiSarkarnama

Parbhani News: आपल्या परदेश दौर्‍यांमधून भारतीय लोकशाही धोक्यात आल्याची राळ उठविणार्‍या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत:च्या पक्षाचाच इतिहासात डोकावून पहावा. (Raosaheb Danve On Rahul Gandhi) आपल्या आजीने लादलेल्या आणीबाणीत विरोधी पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेले अन्याय, अत्याचार व छळवादाच्या घटना तसेच वर्तमानपत्राच्या केलेल्या मुस्कटदाबीच्या घटना तपासाव्यात, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांना लगावला.

Raosaheb Danve On Rahul Gandhi
Raosaheb Danve News : भाजप सर्वात शक्तीमान पक्ष, संधीचं सोनं करा...

भाजपच्या वतीने आयोजित `आणीबाणी विरोधी` कार्यक्रमात दानवे (Raosaheb Danve) बोलत होते. दानवे यांनी काँग्रेसच्या धोरणांसह नेतेमंडळींच्या बेताल वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. याच काँग्रेसजणांनी या देशातील लोकशाहीची सातत्याने क्रुर चेष्टा केली. विशेषतः आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा छळ केला. (Rahul Gandhi) विरोध करणार्‍यांना जेलमधे डांबले, सामाजिक कार्यकर्तेही यातून सुटले नाहीत.

वर्तमानपत्रांचीसुध्दा मुस्कटदाबी केली. आणीबाणीतील काँग्रेसजणांच्या अन्याय, अत्याचार व छळवादाच्या कथा सर्वश्रुत आहेत. असे असतांना सुध्दा काँग्रेसचे नेते आणीबाणीच्या विरोधात ब्र काढत नाहीत. (Parbhani) परंतु, परदेश दौर्‍यांमधून भारतीय लोकशाहीची क्रुर चेष्टा करण्याचा प्रकार सुरु केला आहे. राहुल गांधी हे त्यात आघाडीवर आहेत. संपूर्ण विश्‍वात भारतीय लोकशाहीचे गुणगाण होत असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक होत असतांना काँग्रेसजणांची पोटदुखी वाढली आहे.

त्यातूनच लोकशाही, धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याची बोंब त्यांच्याकडून ठोकली जात आहे. काँग्रेसजणांनी भारतीय लोकशाही व मोदी सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु, काँग्रेसजणांचे हे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत, कारण तमाम भारतीयांना तसेच परदेशातसुध्दा मोदी यांच्या कार्यपध्दतीवर मोठा विश्‍वास आहे. दिवसेंदिवस तो दृढ होत आहे, असे म्हणत दानवेंनी काॅंग्रेसवर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, प्रदेश प्रतिनिधी, संतोष मुरकूटे, विठ्ठलराव रबदडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, डॉ. अनिल कांबळे, प्रदेश प्रवक्ते देशमुख, बाळासाहेब जाधव, सुरेश भुमरे, राजेश देशपांडे दिनेश नारवडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com