Beed Police Action : बीड पोलीस अॅक्शनमोडमध्ये; वाल्मिक कराडनंतर आणखी एका गँगवर मकोका !
Beed News : केज तालुक्यातील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सात आरोपींवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली. वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. या घटनेनंतर बीडसह राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे.
या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे बीडमधूनच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगविरोधात देखील पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरोधात मकोका लावण्यात आला आहे, एकूण सहा आरोपींविरोधात मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. बीड पोलिसांनी आठवले गॅंगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे. 13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस (Beed Police) ठाणे हद्दीत गोळीबारची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे.
या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. विश्वास दादाराव डोंगरे असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. डोंगरे आणि आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. यामध्ये विश्वास दादाराव डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. आता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, या प्रकरणातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरोधात मकोका लावला आहे, एकूण सहा आरोपींविरोधात मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.