Nagpur Politics : दुष्यंत चतुर्वेदी उद्धव ठाकरेंच्या सैनिकांचा हिशोब चुकता करणार का?

Shiv Sena Uddhav Thackeray Nagpur Municipal Election Eknath Shinde Shiv Sena leader Dushyant Chaturvedi : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षातील इच्छुकांकडून एकनाथ शिंदे शिवसेनेत गेलेले दुष्यंत चतुर्वेदी यांनी वर्गणी गोळा केल्याचा आरोप आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार आणि नागपूर शहराचे माजी संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी आणि निष्ठावंत शिवसैनिकांचे कधीच पटले नाहीत.

शिवसेना आणि शिवसैनिकांसोबत काडीचाही संबंध नसताना त्यांना थेट नागपूरवर लादण्यात आले होते. त्यामुळे मोठा असंतोष उफाळून आला होता. आता काळाची पावले ओळखून चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' केला. सध्या ते शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत. मात्र त्यांच्यावर होत असलेले आरोप कायम आहेत.

संपर्क प्रमुख या नात्याने त्यांनी महापालिकेची निवडणूक (Election) लढण्यास इच्छुक असलेल्यांकडून प्रत्येक दोन हजार रुपयांची वर्गणी गोळा केली होती. पक्ष सोडताना ती त्यांनी कार्यालयात जमा केली नाही. ही रक्कम कुठे आहे अशी विचारणा शिवसैनिकांमार्फत सोशल मीडियावरून केली जात आहे. हे बघता चतुर्वेदी उद्धव सेनेचा हिशेब चुकता केव्हा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Jitendra Awhad on Mahayuti government : जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वाद चिघळणार; औरंगजेबाच्या कबरीवरून नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री व नागपूरचे (Nagpur) पालकमंत्री सतीश चतुर्वेदी सक्रिय असताना दुष्यंत चतुर्वेदी यांचा राजकारणाशी काही एक संबंध नव्हता. नागपूरमधील शाईफेक प्रकरणारनंतर सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. त्यावेळी अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष होते. बाळासाहेब थोरातांनी त्यांचे निलंबन मागे घेतले होते. या दरम्यान, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोट निवडणुकीत उद्धव सेनेच्यावतीने अचानक दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव पुढे येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

Uddhav Thackeray
BJP Nitesh Rane : 'त्यांनी 'जय शिवराय' नाही, तर 'अल्ला हू अकबर' म्हणावं'; मंत्री नीतेश राणेंनी जयंतराव अन् कोल्हेंना डिवचलं (VIDEO)

दुष्यंत चतुर्वेदी विजयीसुद्धा झाले होते. युवा नेते आदित्य ठाकरे यांची मैत्रीमुळे त्यांची लॉटरी लागल्याचे सांगण्यात येत होते. पुढे त्यांना थेट नागपूरचे संपर्क प्रमुख करण्यात आले होते. या दरम्यान नागपूर महापालिकेची निवडून 2022 होण्याची शक्यता असल्याने चतुर्वेदी यांनी इच्छुकांकडून प्रत्येक दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली होती. अनेकांनी दोन ते तीन प्रगावर आपला दावा करण्यासाठी वर्गणी जमा केली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली.

या दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा महायुती सत्तेवर आली. उद्धव सेनेचे राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचे बघून दुष्यंत चतुर्वेदी शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. मात्र त्यांनी गोळा केलेल्या वर्गणीवरून आता वाद सुरू झाला आहे. गडगंज असलेल्या चुतर्वेदी यांच्यासाठी गोळा केलेली रक्कम फारच अत्यल्प आहे. मात्र हा हिशेब चुतर्वेदी कसा चुकता करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com