Santosh Deshmukh Case : न्यायाधीशच रजेवर, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी रखडली, आता 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

Beed murder case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज मंगळवारी (ता.17) विशेष मकोका न्यायालयात पार पडणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आजची सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case sarkarnama
Published on
Updated on

Beed News, 17 Jun : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज मंगळवारी (ता.17) विशेष मकोका न्यायालयात पार पडणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आजची सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे.

बीड येथील विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एवढ्या महत्वाच्या प्रकरणावरील सुनावणीवेळी न्यायाधीश रजेवर कसे गेले? अशी चर्चा रंगली आहे.

Santosh Deshmukh Case
Manoj Jarange : 'मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही'; मनोज जरांगेंची आता मराठा आरक्षणासाठी 'आरपार'ची लढाई

आजच्या सुनावणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर आरोप निश्चिती करण्याबाबत युक्तिवाद केला जाण्याची शक्यता होती. शिवाय त्याच्या मालमत्ते संदर्भातही आज युक्तीवाद होण्याची शक्यता वर्तवली जात होता.

मागील सुनावणीत काय झालं?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मागील सुनावणीत सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप निश्चिती संदर्भात पुरेसे पुरावे असल्याने वाल्मीक कराडवर आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केला होता.

Santosh Deshmukh Case
BJP Politics : भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी बडगुजर मुंबईला रवाना, पण बावनकुळे म्हणतात, "चर्चेशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही..."

मात्र, यावर वाल्मीक कराडच्या वकीलांनी युक्तीवाद करत अद्याप डिजिटल पुरावा मिळाला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आरोप निश्चितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्याबाबत आज कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तीवाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्यायाधीशच गैरहजर असल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com