

Pune News, 23 Feb : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 165 जागांसाठी 1153 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तब्बल 750 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या असल्याचं समोर आलं आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 750 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली आहे. एकूण 1153 उमेदवार रिंगणात असताना, हे प्रमाण मोठे आहे आणि यात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने यात आघाडी घेतली असून, त्यांच्या 87 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
शिवसेनेनंतर आम आदमी पार्टी (आप) चे 81 उमेदवारांचे डिपॉझिट गेले, तर काँग्रेस चे 50 उमेदवारांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप ने सर्वाधिक 119 जागा जिंकल्या असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 27 जागा जिंकले आहेत. तर काँग्रेस 15, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 3 आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळाली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड असं मोठ यश आलं असलं तरी भाजपच्या चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेने ने 120 जागा लढवल्या, पण एकही जागा जिंकता आली नाही आणि त्यांचे अनेक उमेदवार अपयशी ठरले. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेने ने 62 जागा लढवल्या, त्यातील 42 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
आम आदमी पार्टी ने 81 जागा लढवल्या आणि सर्व उमेदवारांचे डिपॉझिट गेले. मनसे ने 44 जागा लढवल्या, पण एकही जागा जिंकता आली नाही आणि 31 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र लढताना अजित पवार गटाने 139 जागा लढवल्या त्यातील 14 जणांचे डिपॉझिट जप्त तर शरद पवार गटाने 34 जागा लढवल्या त्यातील 19 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ही आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.