बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सुत्रधार सुदर्शन घुले याच्यासह चौघे फरार आहेत. फरारी आरोपींचा सहा पथके शोध घेत आहेत. केज पोलिसांच्या भूमिकेवरील संशयामुळे आता या प्रकरणाचा तपास केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मिना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पकडलेल्या आरोपींना केज ऐवजी बीडला ठेवण्यात आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी (ता. १०) तीन वाजता केज जवळील टोल नाक्यावरुन अपहरण करण्यात आले. (Beed News) सायंकाळी त्यांचा मृतदेह दैठणाजवळ आढळून आला. दरम्यान, केज पोलिसांची या प्रकरणात भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आहे.
गुन्हा नोंदविण्यास उशिर, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करत सोमवार पासून सुरु झालेले आंदोलन मंगळवारी सायंकाळ पर्यंत सुरु होते. (Police) उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता व उत्तरीय तपासणीही केली नव्हती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील जयराम माणिक चाटे (वय 21, रा. तांबवा, ता. केज) व महेश सखाराम केदार (वय 21, रा. मैंदवाडी, ता. धारुर) यांना ताब्यात घेतले.
आरोपींना केज ऐवजी बीडला पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले आहे. आरोपींच्या शोधासाठी सहा पथके रवाना झालेली आहेत. वाशी (जि. धाराशीव) येथे वाहन सोडून मुख्य आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, केज पोलिसांबद्दलचे आरोप व भूमिकेमुळे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पेालिस अधीक्षक कमलेश मिना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, रजेवर असलेले पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ मंगळवारी (ता. 10) दुपारनंतर जिल्ह्यात परतले. त्यांनी मस्साजोगला भेट देऊन मनोज जरांगे यांच्यासह आंदोलक, नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक कमेलश मिना सोबत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.