MLA Namita Mundada News पाच वर्षाच्या 'वियाना'सोबत आमदार नमिता मुंदडा शपथविधीला

MLA Namita Mundada took oath with her five-year-old daughter : तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं.
MLA Namita Mundada News
MLA Namita Mundada NewsSarkarnama
Published on
Updated on

बीड : पाच वर्षांपूर्वीची ती सकाळ अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. गर्भवती अवस्थेत, हृदयात असंख्य स्वप्नं, भीती आणि अनेक जबाबदाऱ्या घेऊन मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या दाराशी उभी होते. माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती, 'आई, तू हे करू शकतेस'!, अशी भावना भाजपच्या केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केल्या.

निमित्त होते विधीमंडळात आमदार पदाची शपथ घेण्यासाठी त्या आपल्या पाच वर्षांच्या वियाना या चिमुकलीला घेऊन पोचल्याचे. (BJP) पाच वर्षानंतर मुलीच्या छोट्या हाताना हातात घेऊन मी पुन्हा एकदा शपथविधिच्या निमित्ताने विधिमंडळाच्या दारात उभी आहे. हा क्षण माझ्यासाठी एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक आई म्हणून खूप आनंददायी, असल्याचे मुंदडा यांनी म्हटले आहे.

MLA Namita Mundada News
BJP Politics : भाजपच्या 'या' नेत्याचा निकालाबाबत 'अंदाज' तंतोतंत ठरला खरा

तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं. (Namita Mundada) दरम्यान, 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर केज विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविलेल्या नमिता मुंदडा यांना पराभव पत्करावा लागला.

MLA Namita Mundada News
Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

त्यानंतर 2019 मध्ये त्या भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या. यावेळी त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. उच्चशिक्षीत (वास्तूविशारद) असलेल्या नमिता मुंदडा दिवंगत लोकनेत्या माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. मागच्या निवडणुकीवेळी त्या काही महिन्यांच्या गर्भवती होत्या.

MLA Namita Mundada News
Beed District Candidate for the post of Minister : बीड जिल्ह्यात मंत्रिपद कोणाला ? मुंडे बंधू वजनदार तर धस, सोळंके सिनिअर

आता तिच त्यांची चिमुकली वियाना पाच वर्षांची झाली आहे. मागच्या वेळी ती गर्भात असताना शपथविधी घेतलेल्या मुंदडांनी यावेळी शपथविधीसाठी तीला सोबत विधीमंडळात आणले आणि सोशल मिडीयावर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com