Ambadas Danve News : आधीच्या घोषणांचा हिशोब द्या, मग मराठवाड्यात पाय ठेवा..

Before holding a cabinet meeting in Marathwada, account for the earlier announcements : सरकार मागचा पाढा गिरवण्याचे काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावे, असे दानवे यांनी म्हटले आहे. गेल्यावर्षी तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : मराठवाड्यावर मागसलेपणाचा लागलेला शिक्का, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान या पार्श्वभूमीवर दरवर्षी मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात यावी. या माध्यमातून मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष, प्रलंबित प्रश्न, रखडलेल्या योजनांना वेग मिळावा हा हेतू आहे. मात्र राज्यात सत्ता कोणाचीही असो, मराठवाड्यात दरवर्षी बैठक घेण्याला काही मुहूर्त लागत नाही. ओरड झाली की बैठक घेऊन हजारो कोटींच्या घोषणा करून मंत्रीमंडळ निघून जाते. पुढे या घोषणांचे काय होते? हे वेगळे सांगायला नको.

सात वर्षानंतर गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 सप्टेंबर रोजी संभाजीनगर मध्ये मंत्रीमंडळ बैठक घेऊन 60 हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. आता पुन्हा याच महिन्यात मंत्रीमंडळ बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. गेल्यावर्षी मंत्रीमंडळ बैठक घेऊन केलेल्या 60 हजार कोटींच्या घोषणांचा हिशोब द्या, मगच मराठवाड्या पाय ठेवा, असा इशाराच अंबादास दानवे यांनी दिला आहे.

महायुती सरकारने गेल्यावर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यावेळी 60 हजार कोटींच्या कामाची घोषणा केली. मात्र त्यातील 60 कोटी रुपयांचे सुद्धा काम झाले नाही. कोकणातून मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र त्याचेही काही झाले नाही, सरकार एकप्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करते आहे.

Ambadas Danve News
Ambadas Danve : पुतळा कोसळल्यानंतर माफीनामा पण अंबादास दानवेंचे 'हे' चार प्रश्न उडवणार CM शिंदेंची झोप

सरकार मागचा पाढा गिरवण्याचे काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावे, असे दानवे यांनी म्हटले आहे. गेल्यावर्षी तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. (Shivsena) विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. यापूर्वी मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2016 रोजी संभाजीनगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक पार पडली होती.

मागील 15 वर्षात विभागात आतापर्यंत फक्त तीन वेळा बैठक झाली होती. 2008 मध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सप्टेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरात मंत्रीमंडळ बैठक घेतली होती. आता त्यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा बैठक होण्याची शक्यता आहे.

Ambadas Danve News
Mahayuti News : महायुतीतील वाद थांबेना! तानाजी सावंतांच्या 'त्या' विधानावर अजितदादांचा आमदार भडकला

सलग दुसऱ्या वर्षी बैठक घेण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना मिळणार असला तरी त्यातून मराठवाड्याच्या वाट्याला काय येणार? प्रलंबित प्रश्न, रखडलेल्या योजना मार्गी लागणार की मग पुन्हा नव्या घोषणांचा पाऊस पाडला जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com