Sanjay Shirsat : हो, खैरेंना ऑफर दिली होती; ती स्वीकारली असती तर आज ते खासदार असते !

Sanjay Shirsat admits to offering Chandrakant Khaire before the Lok Sabha elections : लोकसभेची निवडणूक असल्याने चंद्रकांत खैरे यांना ऑफर दिली होती. शिवसेनेतील ते जेष्ठ नेते आहेत, आम्हाला पक्ष वाढवायचा असल्याने तेव्हा आम्ही त्यांना आमच्या पक्षाकडून लोकसभा लढवण्याची विचारणा केली होती.
Sanjay Shirsat | Chandrakant Khaire
Sanjay Shirsat | Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : लोकसभा निवडणुकीआधी मला शिंदे गटाकडून ऑफर होती, संजय शिरसाट यांनी माझ्याकडे काही माणसं पाठवली होती. तर भाजपाने देखील राज्यपाल पदाची ऑफर दिल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काल केला होता.

यावर राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. हो, खैरेंना आम्ही ऑफर दिली होती, अशी कबुलीच त्यांनी दिली आहे. खैरे यांनी तेव्हा आमची ऑफर स्वीकारली असती तर ते खासदार असते, असेही शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Shivsena) शिवसेना विरुद्ध उद्धवसेना असा संघर्ष सध्या जोरात सुरू आहे. पक्ष फोडल्यानंतर आता स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रीय झाला आहे. माजी महापौरासह, पदाधिकारी, शिवसैनिकांना पक्षात घेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हादरे देण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू आहे. आणखी दहा ते बारा माजी नगरसेवक लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने रोज एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल लोकसभा निवडणूकीपूर्वी आपल्याला शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून ऑफर होती, असा दावा करत खळबळ उडवून दिली होती. यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खैरेंच्या दाव्याची पुष्टी केली आहे. हो, नक्कीच आम्ही तेव्हा लोकसभेची निवडणूक असल्याने चंद्रकांत खैरे यांना ऑफर दिली होती. शिवसेनेतील ते जेष्ठ नेते आहेत, आम्हाला पक्ष वाढवायचा असल्याने तेव्हा आम्ही त्यांना आमच्या पक्षाकडून लोकसभा लढवण्याची विचारणा केली होती.

Sanjay Shirsat | Chandrakant Khaire
Sanjay Shirsat On Shivsena UBT : एकनाथ शिंदेंनी एक इशारा केला तर उद्धव सेनेचे सगळे आमदार आमच्याकडे येतील!

चंद्रकांत खैरे यांनी तेव्हा आमची ऑफर स्वीकारली असती आणि लोकसभेची निवडणूक लढवली असती तर ते आज खासदार असते. मात्र, त्यावेळी त्यांनी आमची ऑफर नाकारली आणि आज त्यांना माजी खासदार म्हणून फिरावे लागत आहे. ऑफर नाकारल्यामुळे त्यांच्याच विरोधात आम्हाला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. संदिपान भुमरे हे लोकसभा लढले आणि जिकंले देखील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

Sanjay Shirsat | Chandrakant Khaire
Uddhav Thackeray News : उद्धवजी, शिवसैनिकांना तुम्ही फक्त भाषण, टाळ्या अन् शाब्दिक टोलेबाजीपुरतेच नकोय; तर...

काय म्हणाले होते खैरे?

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला खासदार पदाची तर भाजपाकडून राज्यपाल पदासाठी ऑफर आली होती. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे या दोन्ही पक्षांच्या ऑफर धुडकावल्या.

लोकसभा निवडणूक होण्याआधी शिवसेना शिंदे गटाने माझ्याकडे काही माणसे पाठवून मला उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांच्यासोबत मी कदापी जाणार नाही, हे ठणकावून सांगितले.

Sanjay Shirsat | Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : पालकमंत्री संजय शिरसाट पहिल्याच डीपीडीसीत अब्दुल सत्तारांना दणका देणार!

एवढेच नाही तर भाजपानेही आपल्याला राज्यपाल करतो अशी ऑफर देत पक्षात येण्याची गळ घातली होती.मी दहा वर्षे आमदार आणि वीस वर्षे खासदार होतो, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले आहे. तर दिल्लीत माझा मोठा जनसंपर्क आहे.

भाजपाच्या दिल्लीतील अनेक नेत्यांनी मला भाजप मध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला खूप काही दिले आहे. आता काही मिळाले नाही तरीही शिवसेना सोडण्याचा विचार माझ्या मनाला कधी शिवणार नाही. मी निष्ठावान शिवसैनिक आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com