Shivsangram Political News: मोठी बातमी! शिवसेना,राष्ट्रवादीनंतर आता शिवसंग्राम फुटली; 'या' बड्या नेत्याची सोडचिठ्ठी

Marathwada Politics : शिवसंग्राम संघटनेत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.ज्योती मेटे यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून काही नेतेमंडळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Jyoti Mete
Jyoti MeteSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.या निवडणुकीसाठी भाजप,काँग्रेससह सर्वच छोट्या मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात्रा, मेळावे, दौरे, भेटीगाठी, बैठका यांच्या पक्षबांधणीनेही वेग पकडला आहे.

एकीकडे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या असतानाच आता दुसरीकडे एक राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता आणखी एक राजकीय पक्ष फुटल्याची माहिती समोर येत आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिवसरात्र कष्टातून उभ्या केलेल्या शिवसंग्राम पक्षातच उभी फूट पडली आहे.शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पडले आहेत.ते लवकरच नव्या पक्षाची संघटनेची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

दिवंगत विनायक मेटेंनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेंबांधणी सुरू केली असून त्यांचे राज्याच्या विविध भागांत दौरेही होत आहेत.अशातच आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. विनायक मेटेंचा प्रचंड विश्वास असलेल्या तानाजीराव शिंदेंनीच शिवसंग्रामची साथ सोडण्याच निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Jyoti Mete
MLA Suresh Warpudkar News : काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांना खंडपीठाचा दिलासा..

आता तानाजी शिंदे हे आपल्या समर्थकांसह रायगडावर जात शिवरायांचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळाचेही अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते रविवारी (ता.1 सप्टें.)नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.

शिवसंग्राम संघटनेत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.ज्योती मेटे यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून काही नेतेमंडळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्योती मेटे यांनी तानाजीराव शिंदेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.त्या म्हणाल्या,मराठवाडा, विदर्भ अन् कोकणात आमची तयारी पूर्ण झाली असून पुढचे लक्ष पुणे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलक जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबतच्या युतीवर ते म्हणाले, आमच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. राजकीय भूमिका स्पष्ट त्यांची स्पष्ट झाली तर आम्ही त्यांच्याकडे दावेदारी करू असंही मेटे यांनी म्हणाल्या.यावेळी त्यांनी बीडकरांनी किती वर्ष क्षीरसागर यांचा नारा लावायचा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Jyoti Mete
Manoj Jarange News: जरांगे पाटलांंचा 'मास्टर प्लॅन' ठरला; बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com