BJP Vs Congress Clash : NEET पेपरफुटी आंदोलनाचे पडसाद; जालन्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले, खासदार काळेंच्या कार्यालयाबाहेर तणाव

BJP, Congress workers clash outside MP Kalyan Kale's office in Jalna : दिल्लीतील आंदोलनानंतर जालन्यात भाजपचे निदर्शने; काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिकारात्मक गर्दी, पोलिसांचा हस्तक्षेप; गोमूत्र शिंपडल्याच्या दाव्याने वाद अधिकच चिघळला.
BJP Vs Congress Clash
BJP Vs Congress ClashSarkarnama
Published on
Updated on

BJP and Congress workers clash in Jalna : दिल्लीत NEET पेपरफुटीप्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दिल्लीत काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही खासदारांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचाही समावेश होता.

या पार्श्वभूमीवर जालना येथे भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी खासदार काळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत त्यांच्या दिल्लीतील आंदोलनाचा निषेध नोंदविला. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे कार्यकर्तेही तेथे जमले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूंना समजावून सांगत परिस्थिती शांत केली.

BJP Vs Congress Clash
Shiv Sena UBT petition : फुटलेल्या सहा खासदारांना 'सर्वोच्च' नोटीस; उद्धव ठाकरेंच्या याचिकेची दखल, लोकसभा अध्यक्षांसह एकनाथ शिंदेंनाही उत्तर द्यावे लागणार

भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून हटवल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोरील परिसरात गोमूत्र शिंपडल्याचा दावा केला. या कृतीवरूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

BJP Vs Congress Clash
Pratap Sarnaik Post : 'रत्नजडित मोबाईलची ती भेट.., फोन केला तर दादा बोलतील असंच वाटतं'; अजित पवारांच्या आठवणीत प्रताप सरनाईक भावुक

आंदोलनातून हिंदू धर्म, प्रभू श्रीराम आणि संघाची बदनामी

माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची परंपरा देशात नसल्याचा दावा केला. तसेच आंदोलनादरम्यान हिंदू धर्म, प्रभू श्रीराम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन धर्माचा उल्लेख करून त्यांचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर टीका करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध आपण यापूर्वीच नोंदविल्याचे सांगत, भाजपचे आंदोलन हे राजकीय स्टंट आहे. भाजप लोकशाहीचे मूल्य जोपसणारी औलाद नाही. चोराच्या उलट्या बोंबा, अशापद्धतीने वागत असून, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागले, असा घणाघात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com