BJP Election Strategy : अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपची रणनीती; तरुण नेत्यावर दिली महत्वपूर्ण जबाबदारी

Nanded BJP News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष आहे.
Kishor Deshmukh
Kishor DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या अधिक असून ती निर्णायक आहे. या युवा मतदारांमध्ये विजयाचे पारडे फिरविण्याची शक्ती आहे. या शक्तीला चुचकारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘नांदेड उत्तर’मध्ये पक्षाला जनाधार वाढविण्यासाठी तरुण नेतृत्वाला संधी दिली आहे. ‘नांदेड उत्तर’च्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख यांची नियुक्ती करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. ते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. (Kishor Deshmukh appointed as Nanded North BJP District President)

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मध्ये आचनक विद्यमान अध्यक्ष सुधाकर भोयर यांची कार्यकाळ संपण्याच्या दोन वर्षे आधीच उचलबांगडी केली आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. या फेरबदलात अर्धापूरचे किशोर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. (BJP Election Strategy )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kishor Deshmukh
Rajan Patils Controversial Statement : राजन पाटलांचे पुन्हा वादग्रस्त विधान; आमदार यशवंत मानेंना काय म्हणाले पाहा...

नांदेड उत्तर भागात भोकर, किनवट, हादगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या तीनही मतदार संघातील संघटनात्मक जबाबदारी किशोर देशमुख यांच्यावर टाकण्यात आली आहे. ते भाजपत येण्यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष होते. संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच, अर्धापूर नगरपंचायतीमध्ये दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत

काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचा पराभव करून धर्मराज देशमुख निवडून आले होते. या विजयात किशोर देशमुख यांचा मोठा वाटा होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख व किशोर देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपात आल्यावर किशोर देशमुख यांना भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले होते.

भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वाला शह देण्यासाठी तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यांचा नांदेड उत्तरच्या विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून संघटन कौशल्य चांगले आहे. याचा फायदा संघटनात्मक बांधणीसाठी होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. हा युवा मतदार आपल्या पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्नशील आहे. यात भाजपने तरुण नेतृत्वाला संधी दिली आहे. विविध आंदोलन, निवडणुकीचे नियोजन, याचे तंत्र किशोर देशमुख यांना चांगले अवगत आहे.

Kishor Deshmukh
Karnataka Politics : ‘आमदारकी, सन्मान देऊनही माजी मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला’

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात असलेल्या अर्धापूर येथील तरुण कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे.

नांदेड उत्तरच्या भागात भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन किशोर देशमुख यांना काम करावे लागणार आहे. तसेच, माजी अध्यक्ष सुधाकर भोयर यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. त्यांना सोबत घेऊन काम करावे लागेल.

Edited By : Vijay Dudhale

Kishor Deshmukh
Karnataka Congress : काँग्रेसला लोकसभेआधी मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्र्यानंतर माजी उपमुख्यमंत्रीही भाजपत जाणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com