Rajan Patils Controversial Statement : राजन पाटलांचे पुन्हा वादग्रस्त विधान; आमदार यशवंत मानेंना काय म्हणाले पाहा...

Mohol Politics : खरं म्हणजे आमदार आहेत यशवंत माने; पण शिव्या खायला मी, अशी मोहोळमधील सध्याची परिस्थिती आहे.
Rajan Patil
Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज पुन्हा एकदा वाद्‌ग्रस्त विधान केले आहे. पाटील यांनी ‘आमदाराचा उल्लेख सालगडी’ असा केला आहे, त्यामुळे पाटील हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. (Former MLA Rajan Patil's controversial statement again)

मोहोळ शहरासाठी 140 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार यशवंत माने यांचा मोहोळमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. त्यात सत्काराच्या सोहळ्यात बोलताना राजन पाटील यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. माजी आमदार पाटील हे अजित पवार गटात आहेत. त्यांनी यापूर्वी केलेल्या एका विधानावरून ते चांगलेच अडचणीत आले होते. (Rajan Patils Controversial Statement )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajan Patil
Karnataka Politics : ‘आमदारकी, सन्मान देऊनही माजी मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला’

सालगडी चांगला असला, तर शेती चांगली होत असते. आपल्या सर्वांच्या कर्मधर्म संयोगाने शरद पवार आणि अजितदादांनी मोहोळला चांगला सालगडी दिला आहे. त्यामुळे आता आपली शेती उत्तम पिकणार आहे. आामदार यशवंत माने यांनी गेल्या चार वर्षांत कशा प्रकारचे काम केले. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले.

पाटील म्हणाले, आमदार माने हे आपल्या कामाच्या माध्यमातून मोहोळ शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकत आहेत, हे मोहोळमधील जनतेच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे आपल्या सत्कारसमारंभासाठी एवढे नागरिक उपस्थित राहिले आहेत. आपले आमदार हे मितभाषी आहेत; पण कर्तृत्ववान आहेत. सोशल मीडियामुळे आता कोण काम करतंय, कोणाच्या अंगी कर्तृत्व आहे, हे सांगण्याची गरज नाही.

Rajan Patil
Abhijeet Patil In Trouble : पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेणारे अभिजित पाटील अडचणीत का आले? पाहा कारणे...

जे कामच करत नाहीत, ते काहीही बोलत असतात. आमदारापेक्षा माझ्यावर जास्त बोलतात. खरं म्हणजे आमदार आहेत यशवंत माने; पण शिव्या खायला मी, अशी मोहोळमधील सध्याची परिस्थिती आहे. मला शिव्या देऊन मोहोळ तालुक्याचा विकास होत असेल तर यापेक्षाही दुप्पटीने शिव्या दिल्या तरी मी आनंदाने स्वीकारेन. मला मोहोळ तालुक्याचा विकास करायचा आहे. हा तालुका विकसित झाला पाहिजे, असे आमचे स्वप्न आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, आमदार यशवंत माने यांनी मोहोळ शहरासाठी पाणी योजना आणली. पण २०११ मध्ये याच तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार हे पाणीपुरवठा मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यापुढं आम्ही ही योजना मांडली होती. मोहोळ शहरासाठी पाणी योजना देण्याची मागणी केली होती. आता माने यांच्यामुळे ही योजना मंजूर झाली आहे.

Rajan Patil
Nashik Politics : बडगुजर यांनी शिंदे गटाचा डाव उलटविला अन्‌ भाजपच्याच अडचणी वाढल्या!

दरम्यान, माजी आमदार राजन पाटील यांनी पुळूज येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत असंच वाद्‌ग्रस्त विधान केले होते. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं होतात, असे त्यांनी विधान केलं होते. त्यावेळी त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका झाली हेाती. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते.

Edited By : Vijay Dudhale

Rajan Patil
Karnataka Congress : काँग्रेसला लोकसभेआधी मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्र्यानंतर माजी उपमुख्यमंत्रीही भाजपत जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com