
बीड : नगपंचायत निवडणुकीच्या (Election) निमित्ताने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंकजा यांनी शनिवारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांच्याकडे किरायाचे मंत्रिपद असल्याचे म्हटले. तसेच मतदारसंघातही त्यांचे काही चालत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) राज्यातील 106 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी येथील भाजपच्या (BJP) उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारसह (MahaVikas Aghadi) धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.
पंकजा म्हणाल्या, धनंजय मुंडे हे दोन वर्षांत ओबीसी आरक्षणाबाबत काहीच बोलले नाहीत. त्यांना त्याचं देणं घेणं नाही. ही निवडणूक (Election) ओबीसींसाठी काळी निवडणुक आहे. ओबीसींचे आरक्षण गमावल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते भाषणबाजी करतात. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होणे दुर्दैवी आहे. सरकारने दोन वर्षात फक्त तारखा दिल्या. आता आघाडीचे नेते रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.
आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे सांगत आता जनता त्यांना रस्त्यावर आणल्या शिवाय राहणार नाही, असे पंकजा म्हणाल्या. बीड जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी जे नारळ फोडले, ते देखील मी मंजूर केलेली कामे होती. तुमच्याकडे पैसे जास्त झाले असतील तर ते ओबीसींसाठी द्या, असा हल्लाबोल पंकजा यांनी केला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन 26 जानेवारीपासून राज्याचा दौरा करणार असल्याचेही पंकजा यांनी यावेळी सांगितले.
सत्ता असतांना कोटयवधी रूपयांचा निधी आणून या भागात विकासाची कामे केली, भविष्यात देखील विकास निधी देऊ, त्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पंकजा यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.