मुंबई : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना (Shivaji Maharaj statue desecrated in Bengaluru) झाल्याप्रकरणाचे पडसाद संपुर्ण राज्यभरात उमटले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी थेट भाजपच्या नेत्यांना नेभळट म्हणत निशाणा साधला आहे.
आव्हाड यांनी ट्विट करत भाजपचा उल्लेख न करता नेत्यांवर टीका केली आहे. 'मी दिवसभर वाट पाहिली. कर्नाटक मध्ये ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांच्यातला एखादा तरी पुढारी बंगळुरू येथील छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून झालेल्या विटंबनेबद्दल निषेध करेल, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली त्याबाबतीत काही बोलतील. पण नेभळटांकडून तेही झाले नाही,' असं म्हणत आव्हाडांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं.
होय...छत्रपती शिवरायांचा मराठी जनतेलाच नव्हे संपूर्ण जगाला अभिमान आहे. आम्ही पेटून उठणारच जेव्हा आमच्या जीवापाड जपलेल्या अस्मितेला तुम्ही हानी पोहोचवणार. तेव्हा आत्ताच सांगतो तुम्ही कुणीही असाल हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. अंगाशी खेटू नका. गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.
दरम्यान, या घटनेवर विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच, असं फडणवीस म्हणाले आहेत.
ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनीही ट्विटव्दारे कर्नाटक प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तत्काळ कठोर कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.