'ऐकाल का, कराल का साध्य? पंकजा मुंडे यांचं भावनिक पत्र...

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त हे पत्रं त्यांनी लिहिलं आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भावनिक पत्र लिहिलं आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची 12 डिसेंबर रोजी जयंती असून त्यानिमित्त हे पत्र लिहिल्याचे दिसते. यादिवशी नवा संकल्प करणार असल्याचे पंकजा यांनी या पत्रात लिहिलं आहे. 'ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प, कराल का साध्य?', असं आवाहन पंकजा यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी यापूर्वी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना साद घातली आहे. तसेच विविध कार्यक्रमांमधून त्यांनी कार्यकर्ते देत असलेल्या साथीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. अनेकदा त्या भावनिकही झाल्या आहेत. अशीच भावनिक साद त्यांनी आताही कार्यकर्त्यांना घातली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून एक संकल्प करणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.

Pankaja Munde
माफी मागा, नाहीतर...! प्रियांका चतुर्वेदींचा शेलार, भातखळकरांना इशारा

'बारा डिसेंबर, तीन जून, आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतो. याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं. तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतंही नाही,' अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन, अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर अंपग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी असे अनेक कार्यक्रम आपण केले, असंही पंकजा या पत्रात म्हणतात.

Pankaja Munde
शशी थरूर महाबळेश्वरला लग्नाला आले अन् प्रश्न पडला...नक्की नवरदेव कोण?

अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, छत्रपती असे सर्व गडावर आले. गोपीनाथ गडावर संघर्ष उत्थान दिन साजरे झाले. अनेक दु:खी कुटुंबीयांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खुप आशिर्वाद कमवले. हे आशिर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मुळी. हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तींशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशिर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात, असं पंकजा यांनी पत्रात लिहिलं आहे.

कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांच्यावर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुरलकी ही प्रेमाविना, आपुलकी-विना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे गुरू, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं, असं म्हणत पंकजा यांनी या 12 डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते. ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प, कराल का साध्य?, असं आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com