Aurangabad District News : फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील गावचे राजकारण गेल्या २५ वर्षापासून दोन कुटुंबाभोवतीच फिरत आहे. Gram panchayat election यावेळीही पुन्हा त्याच कुटुंबातील चुलत सासू-सूना सरपंच पदासाठी एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. याची चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.
पाथ्री येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आतापर्यंत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी पाथ्रीकर हे ५ वर्ष सरपंच राहिले तर त्यांचा मुलगा महेंद्र पाथ्रीकर हा देखील पाच वर्ष सरपंच होता. (Aurangabad) त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले त्यांचे पुतणे जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक राजेंद्र पाथ्रीकर यांनी देखील दहा वर्ष सरपंच म्हणून कारभार पाहिला आहे. (Marathwada)
तर राजेंद्र पाथ्रीकर यांचा चुलत भाऊ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर हे देखील पाच वर्ष सरपंच पदी विराजमान राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही कुटुंबानी २५ वर्षे सरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण महिलेची जागा सरपंच पदाला आरक्षित असल्याने यावेळीही शिवाजीराव पाथ्रीकर यांची पत्नी मंगलबाई तर राजेंद्र पाथ्रीकर यांच्या पत्नी वर्षा या चुलत सासु-सुना सरपंच पदासाठी लढत आहेत.
तर मंगलाबाई पाथ्रीकर यांची चुलत जाऊ सुनीता संजय पाथ्रीकर या देखील तिसरी आघाडी करून जनतेला पर्याय म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यामुळे पाथ्री गावातील ग्रामस्थ पुन्हा या दोन्ही कुटुंबातील सासु-सुनेला बहुमत देणार का? की मग तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना संधी देणार हे निवडणूकीनंतर स्पष्ट होणार आहे.
शिवाजीराव पाथ्रीकर हे राजेंद्र पाथ्रीकर यांचे चुलत चुलते आहेत. त्यामुळे मंगलबाई पाथ्रीकर या वर्षा पाथ्रीकर यांच्यात सासू -सुनाचे नाते आहेत. तर तिसऱ्या उमेदवार सुनिता पाथ्रीकर व मंगलाबाई पाथ्रीकर यांच्यात चुलत जावा-जावांचे नाते आहे. एकंदरीत पाथ्री ग्रामपंचायतची निवडणुक एकमेकाच्या नातेवाईक भोवती फिरत आहे. त्यामुळे सरपंच पदाचे उमेदवार एकमेकांच्या नात्यात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.