Maratha Reservation News : विरोध सुरू होताच मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...

Maharashtra News : हा विषय अत्यंत संवेदनशीलपणे आणि तत्काळ कारवाई करत, मराठा समाजाला त्याचा आरक्षणाचा हक्क बहाल करावा.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावरून राज्यात सुरू असलेले आंदोलन याचा धसका जसा राज्य सरकारने घेतला आहे, तसा तो सत्ताधारी आमदारांनीही घेतला आहे. (Maratha Reservation News) गाव, तालुका, जिल्हा बंदीमुळे सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी हैराण झाले आहेत. विशेषतः सत्ताधारी भाजपला मराठा समाजाच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.

Maratha Reservation News
Parbhani Political News : शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांची राष्ट्रवादी हमरीतुमरीवर

मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर त्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही बसणार आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या भाजप (BJP) आमदारांनी आता मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा धडाका सुरू केला आहे.

निलंग्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, (Smabhaji Patil Nilangekar) परतूरचे बबनराव लोणीकर, (Babanrao Lonikar), औसाचे अभिमन्यू पवार, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे यात आघाडीवर आहेत. संभाजी पाटील निलंगकेर यांनी २७ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, समाजाने कायमच या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये आपले भरीव योगदान दिले आहे. परंतु दुर्दैवाने आज या समाजाची फार बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आणि मनोजजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी कळकळीची विनंती आहे, की त्यांनी हा विषय अत्यंत संवेदनशीलपणे आणि तत्काळ कारवाई करत, मराठा समाजाला त्याचा आरक्षणाचा हक्क बहाल करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तर परतूरचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही अशाच आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तर कायद्याच्या चौकटीत टिकणारे कायमस्वरूपी आरक्षण द्या, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.

तिकडे हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर आपण २०२४ ची विधानसभा निवडणूकच लढवणार नाही, असे घोषित केले. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मी मराठा घरामध्ये जन्मलो असून, मराठा समाजाच्या संदर्भात मलाही कळवळा आहे. मागील काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यावेळी समाजातील अनेक मोठ्या पदावर नोकरीस लागले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. एकूणच मराठा समाजामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरोधात असलेला रोष पाहता भाजपने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्याचे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com