Nanded politics : नांदेडमध्ये दाखल होताच अशोक चव्हाणांंचा काँग्रेसला दणका; भाजपला 55 माजी नगरसेवकांची सलामी...

Ashok Chavan News : नांदेड शहरात अशोक चव्हाण हे आठ दिवस तळ ठोकून राहणार आहेत.
55 former Congress corporators join BJP
55 former Congress corporators join BJP Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण नांदेड शहरात तळ ठोकून असून, त्यांनी काँग्रेसला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. नांदेड वाघाळा महापालिकेतील काँग्रेसच्या तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. (BJP News)

नांदेड शहरात आगमन झाल्यानंतर अशोक चव्हाण हे भलतेच ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसला जबरदस्त हादरा दिल्याने काँग्रेसचे पाय अधिकच खोलात जात आहेत. नांदेड महापालिकेत स्थापनेपासून काही अपवाद वगळता काँग्रेसची सत्ता राहिली आहे. (Congress corporators)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

55 former Congress corporators join BJP
Narayan Rane : लोकसभा लढविण्याबाबत नारायण राणेंचे मोठे विधान; म्हणाले, ‘कोणाला सांगायचे ते सांगा...’

गेल्या निवडणुकीत 82 पैकी तब्बल 72 नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा राज्यात युतीची सत्ता होती. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे पक्षाचे झालेले डॅमेज भरून काढण्यासाठी काँग्रेसने नांदेडला निरीक्षक पाठविले होते. या निरीक्षकांनी बैठका घेतल्या, या बैठकीत पक्ष सोडून कोणीच जाणार नाही, असे ठामपणे सांगितले होते. (Marathi Political News )

काँग्रेसचे पक्षनिरीक्षक नांदेड सोडून गेले की, माजी नगरसेवकांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणे पसंत केले. नांदेडला आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांच्या सोबत कोणी गेले नाही, पक्ष मजबूत आहे, असा दावा केला होता. पण, या दाव्यातील हवाच चव्हाणांनी काढणे सुरू केले आहे.

काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नगरसेवकांच्या प्रतिनिधींची नांदेड शहरात अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत बहुसंख्य माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष प्रवेश केला. या बैठकीला माजी आमदार अमरनाथ राजूरकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

55 former Congress corporators join BJP
Baramati Loksabha : बारामतीत एकेका मताची बेरीज सुरू; शरद पवारांनंतर सुनेत्रा पवारांनीही घेतली पृथ्वीराज जाचकांची भेट

नांदेड शहरात अशोक चव्हाण हे आठ दिवस तळ ठोकून राहणार आहेत. या नांदेड मुक्कामात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क करून काँग्रेस खिळखिळी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. याची झलक आज झालेल्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने दिसली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

55 former Congress corporators join BJP
NCP News : शरद पवारांच्या विश्वासू आमदाराने घेतली अजितदादांची भेट...राजकीय चर्चांना उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com