Ashok Chavan : काॅंग्रेस - भाजपमधील नव्या - जुन्या निष्ठावंतांना आपलसं करण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरणार?

Nanded BJP Political : आपल्यासोबत असलेल्यांचे पुनर्वसन व नव्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची कसरत करावी लागणार.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : भाजपमध्ये अशोक चव्हाण आले आणि तीन ते चार दिवसांत खासदार झाले आहेत. त्यांच्या येण्याने राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची राज्यसभेत जाण्याची संधी हुकली आहे. अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश केले सहकारी त्यांना साथ देतील. पण भाजपचे जुने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चव्हाणांना आपलसं करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच आपल्यासोबत असलेल्यांचे पुनर्वसन व भाजपमधील जुन्या निष्ठावंतांना सोबत घेऊन काम करण्याची कसरत करावी लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाला अशोक चव्हाण यांच्या सारखा अभ्यासू व संयमी नेता मिळाला आहे. त्यांची जरी कर्मभूमी नांदेड असली तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे समर्थक आहेत. ही बाब हेरून त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे. पक्ष प्रवेशानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. तर आता लोकसभा निवडणुकीची मराठवाड्यातील जबाबदारी चव्हाणांच्या खांद्यावर देणार असल्याची चर्चा आहे.

Ashok Chavan
Loksabha Election 2024 : चव्हाण - चिखलीकरांत दिलजमाई; दोन्ही कट्टर विरोधक एकत्र...

नांदेड जिल्ह्यात काॅंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी काॅंग्रेसला पर्यायाने अशोक चव्हाण यांना विरोध करीत पक्षाचे काम केले आहे. यात जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना काॅंग्रेसच्या विरोधात संघर्ष करावा लागला आहे. नांदेड शहरात व जिल्ह्यातील काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रवेश केला असून येणाऱ्या काळात आणखी प्रवेश होतील. भाजपमध्ये अशोक चव्हाण यांच्या जाण्याआधीच काॅंग्रेसमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे सर्व जुने व नवे सहकारी त्यांना साथ देतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर नांदेडसह मराठवाड्याची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत यश संपादन करायचे असेल तर चव्हाण यांना भाजपतील जुन्या निष्ठावंतांना आपलसं करुन घ्यावे लागणार आहे. तसेच चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे. मात्र यांच्यात काम करताना ताळमेळ कसा बसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Ashok Chavan
Modi's Yavatmal Tour : भावनाताई आपली कामेही सांगणार की केवळ ‘मोदी है तो मुमकीन है’चे गुण गाणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com