Marathwada Politics News : भाजप शहराध्यक्षाच्या मुलीच्या लग्नात नेत्यांचे `हम साथ साथ है`...

BJP News : एकमेकांना शिव्या घालणारे नेते जेव्हा ते सगळ विसरून एकत्र येतात तेव्हा मात्र हसावे की रडावे असा प्रश्न पडतो.
Marathwada Politics News
Marathwada Politics News Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राजकारणात कायम कुणी कोणाचा शत्रू आणि मित्र नसतो असं नेहमीच म्हटलं जात. खरतरं राजकारणात जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी एकमेकांचे विरोधक असल्याचे चित्र निर्माण केले जाते, प्रत्यक्षात सगळ्याच पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी मैत्रीपुर्ण, राजकीय, कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असतात. (Marathwada Politics News) जाहीरसभा, मेळावे, माध्यमांसमोर एकमेकांचे अक्षरशः वस्त्रहरण करणारे हेच नेते जेव्हा एखाद्या खासगी कार्यक्रम किंवा विवाह समारंभात एकत्र येतात तेव्हा मात्र असे गळाभेट घेतात जणू त्यांच्यात कुठलाहीच वाद नाही.

Marathwada Politics News
Shivsena Vs BJP : अंबादास दानवेंनी केलं आरोग्य विभागाचं 'ऑपरेशन'

असे चित्र अनेक नेते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दिसते. कार्यकर्ते मात्र अशा नेत्यांना आपला कट्टर शत्रू समजून कायम हमरीतुमरीवर उतरण्याच्या तयारीत असतात. (BJP)भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते शिरीष बोराळाकर यांच्या मुलीचा शहरातील एका मोठ्या हाॅटेलमध्ये विवाह सोहळ्या निमित्त स्वागत समारोह पार पडला.

या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी लावलेली हजेरी, तिथे राजकीय विरोधक म्हणून मिरवणाऱ्या अनेकांनी एकमेकांच्या घेतलेल्या गळाभेटी, हस्तांदोलन पाहून त्यांचे कार्यकर्तेही चक्रावून जातील असेच हे चित्र होते. (Shivsena) राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य हे वेगळे असते, पण ते ऐकायला आणि पचायला जरा जडच जाते. (Imtiaz Jaleel) तसेच काहीसे एकमेकांना शिव्या घालणारे नेते जेव्हा ते सगळ विसरून एकत्र येतात तेव्हा मात्र हसावे की रडावे असा प्रश्न पडतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरीष बोराळकर हे भाजपचे जुने पदाधिकारी आहेत. जेव्हा भाजपची जिल्ह्यात ताकद नव्हती तेव्हापासून संघटनेत काम करणारे खेळाडू असलेले बोराळकर नंतर मात्र दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढले, मात्र त्यांना यश आले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची आधी राज्य प्रवक्ते आणि आता भाजप शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. बोराळकर यांच्या मुलीचा विवाह नुकताच पार पडला.

स्वागत समारंभाला देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून हजेरी लावली. या शिवाय खासदार इम्तियाज जलील, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह सर्वच प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थिती होते. या विवाह सोहळ्यात एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या या नेत्यांच्या भेटीगाठी, चर्चा, हास्यविनोद याची चर्चा आता चांगली होऊ लागली आहे.

Marathwada Politics News
Asaduddin Owaisi Statement : आता मुंबई, चेन्नई, हैदराबाद केंद्रशासित प्रदेश होतील...! ओवैसीचं मोठं विधान

खासदार इम्तियाज जलील जेव्हा नवदाम्पत्यास आशिर्वाद देण्यासाठी गेले तेव्हा तिथे मंत्री अब्दुल सत्तारही उपस्थीत होते. एकमेकांच्या शेजारी उभे राहत त्यांनी फोटोग्राफर्सला हवे असलेले छायाचित्र दिले. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, सत्तार, इम्तियाज हे ऐकमेकांना भेटले अन् हास्यविनोदातही रंगले. पुढे इम्तियाज यांनी अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल यांची भेट घेत त्यांच्याशीही चर्चा केली.

खासदार इम्तियाज जलील यांच्या एमआयएमवर भाजपची बी टीम म्हणून नेहमी टीका केली जाते. प्रामुख्याने काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षाकडून याचा वारंवार उल्लेख केला जातो. पण इम्तियाज आणि त्यांच्यासोबत दिसणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यांची वेगळी अशी राजकीय कहाणी आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाच्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदासंघातून इम्तियाज जलील यांनी प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता. त्यानंतर हे दोघे क्वचितच एकत्र आले.

Marathwada Politics News
MP Imtiaz Jaleel News : दळणवळण प्रगतीचे श्रेय गडकरीजी तुमचेच, माझ्या मतदारसंघावर अन्याय का ?

निवडक ठिकाणी एकत्र आले तरी त्यांच्यात फारसे संभाषण झाल्याचे दिसले नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे दोन्ही हात धरून इम्तियाज त्यांना काहीतरी सांगतांना दिसत आहेत. जालना-संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी एमआयएमची मते मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. जातीयवादी पक्ष म्हणून ज्या एमआयएमला विरोध करता त्या पक्षाची मते तुम्हाला कशी चालतात? अशी टीका दानवे यांच्यावर विरोधक करतात.

अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांची मैत्री तर उघड आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या विजयात माझाही वाटा आहे, असे सत्तार जाहीरपणे सांगतात. विशेष म्हणजे इम्तियाज जलील हेही `सत्तार मेरे बडे भाई है, वो मुझे कभी हारने नही देंगे`, असे म्हणत त्यांच्या पाठिंबा कबुल करतात. भाजपच्या स्थानिक नेत्यांशीही इम्तियाज यांचे अनेक मुद्यांवरून कायम खटके उडत असतात. पण ते फक्त राजकारणाच्या मैदानात, वैयक्तिक आयुष्यात मात्र `हम साथ साथ है`, हेच कालच्या स्वागत समारंभात राजकारण्यांनी दाखवून दिले.

Edited By : Jagdish Pansare

Marathwada Politics News
Satara BJP News : तृणमूल खासदाराचा भाजपने केला निषेध; कायमच्या बडतर्फीची केली मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com