Marathwada Political News : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तसा सर्व्हेच पक्षाच्या वतीने करण्यात आला होता, अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या संदर्भात भाष्य केल्याचा दावा केला जातोय. पण भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठा भाऊ, छोटा भाऊ असा कुठलाही सर्व्हे भाजप करत नाही, असे स्पष्ट केले. आमचा पक्ष हा चोवीस तास काम करणार पक्ष असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपची मराठवाडा विभागीय कार्यशाळा आज पार पडली. रविंद्र चव्हाण यांनी या कार्यशाळेच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला. देशभरात (BJP) भाजपच्या वतीने राबविण्यात येत असेले संघटन पर्व अंतिम टप्प्यात आले आहे. 1224 मंडळांची स्थापना या निमित्ताने राज्यात पूर्ण झाले आहे. 80 जिल्हा अध्यक्षांच्या नेमणूक झाल्या आहेत. सर्व विभागातील पदाधिकारी यांच्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
या माध्यमातून सर्व संघटनात्मक, जिल्हा अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीत भाजप पक्षाची संरचना कशी, असावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. संकल्प ते सिद्धी ही संकल्पना या निमित्ताने देशभरात राबवली जात आहे. मोदी यांचे कामकाज हे फक्त भारता पुरते नाही तर ते जगभरात काम करतात, असेही चव्हाण म्हणाले.
2014 ते आज पर्यंत देशाची अर्थव्यवस्था आज जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आणण्याचा काम मोदी यांच्या नेतृत्वात झाले आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिंगरोड, मेट्रो, रेल्वे जाळे, नवीन रस्ते बांधले जात आहेत. आपला देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. हे सर्व भाजप च्या कार्यकर्त्यांनी गावागावापर्यंत पोहोचावे यासाठी संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील 5 ते 15 ऑगस्ट पर्यंत असे दीड महिना वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम राबविणार असून 25 जून हा काळदिवस म्हणून पाळला जाणार आहे. योगदिनी सर्व संघटना, योग शिक्षक यांना सोबत घेऊन पक्षाने कार्यक्रम राबवावेत, असे आजच्या कार्यशाळेत ठरले. 9 जूनपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होईल आणि त्या नंतर यासर्व कार्यक्रमांना सुरुवात होईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भाजप आणि संघटन 24/7 संघटनात्मक दृष्टया विचारधारा जोडण्याचा प्रयत्न करीत असतो. कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र निवडणूक जिंकणे आणि निवडणूकी बाबत निर्णय घेणे यासाठी वेगळी व्यवस्था आहे. सर्व निर्णय पार्लमेंट बोर्ड घेत असते, त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता नेहमी तयार असतो, असेही चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.