Sudhakar Shrangare : खासदार सुधाकर शृंगारेंची उमेदवारी धोक्यात; लातूरमध्ये भाजपचं गणित काय ?

Latur Loksabha Constituency : महायुतीच्या मेळाव्यात शृंगारे फक्त हजेरी लावतात...
Sudhakar Shrangare
Sudhakar ShrangareSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : लातूर लोकसभा मतदारसंघातून खासदार सुधाकर शृंगारे गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. असे असतानाही त्यांना आपल्या कारकिर्दीच्या पाच वर्षांत छाप पाडता आली नाही. परिणामी भाजप, खासदार सुधाकर शृंगारे यांचा पत्ता येत्या निवडणुकीत कट करणार, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. पाच वर्षांच्या काळात खासदार शृंगारे यांच्या प्रगती पुस्तकावर जनतेकडूनच निष्क्रियतेचा शिक्का मारला गेल्याचे बोलले जाते.

संभाव्य लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केलेली आहे. त्यासाठी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात हजेरीपलिकडे सुधाकर शृंगारे (Sudhakar Shrangare) यांचा फार सहभाग आणि वावर अजूनही जिल्ह्यात दिसत नाही. संयमी, मीतभाषी असलेल्या सुधाकर शृंगारे यांचे पाच वर्षांत खासदार म्हणून जिल्ह्याला फारसे अस्तित्वच जाणवले नाही. त्यामुळे भाजप त्यांना यंदा रिप्लेस करण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे.

Sudhakar Shrangare
Rohit Pawar Vs Ram Shinde : पेपर लोकसभेचा; पण रोहित पवार अन् राम शिंदेंची तयारी विधानसभेची

पक्षाने उमेदवारी कोणालाही दिली तरी कमळ चिन्ह हाच आपला उमेदवार समजून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे, अशा सूचना प्रत्येकाला पक्षश्रेष्ठींकडून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? यापेक्षा मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप (BJP) आपली शक्ती पणाला लावणार आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे फारशी स्पर्धा नसते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रयत्नातून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळाली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले, मात्र 2024 मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये बरीच स्पर्धा दिसून येते. शिवाय विद्यमान खासदार यांच्या पाच वर्षांतील कामगिरीवर भाजपमधील जिल्ह्यातील काही नेते, पदाधिकारीच समाधानी नसल्याचे सांगितले जाते. अशावेळी शृंगारे यांच्याऐवजी दुसऱ्या चेहऱ्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जाऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यमान खासदारांनी मागील पाच वर्षांत काय कामे केली, गावागावांतील कार्यकर्त्यांशी कसा संपर्क ठेवला, खासदार निधी वाटप यासह आदी विषय या निवडणूकनिमित्ताने समोर येणार आहेत. लातूर (Latur) लोकसभेचा मतदारसंघ मोठा असून गावातील कार्यकर्त्यांशी जनसंपर्क असणे गरजेचे आहे. शिवाय पुन्हा मतदारांसमोर जायचे तर सांगण्यासाठी ठोस विकासकामेही नाहीत, अशीच काहीशी स्थिती शृंगारेपुढे आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार श्रृगांरे लातूरमधून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजते. भाजपच्या पक्षांतर्गत पाहणीतही शृंगारे यांच्याविरोधात नाराजी असल्याचे समोर आले आहे. एकीकडे भाजपसमोर महाराष्ट्रात मिशन 45 गाठण्याचे उद्दिष्ट, तर दुसरीकडे मजबूत असलेल्या लातूरमध्ये विद्यमान खासदाराविरोधात नाराजी, अशावेळी भाजप जोखीम पत्करणार नाही. त्यामुळे सुधाकर शृंगारे यांना यंदा भाजप रिप्लेस करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Sudhakar Shrangare
Jitendra Awhad : राम मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांना घरचा आहेर; रामाच्या झेंड्यांनी कळवा भगवामय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com