Jitendra Awhad : राम मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांना घरचा आहेर; रामाच्या झेंड्यांनी कळवा भगवामय

Mumbra-Kalwa And Ram Temple : शरद पवार गटाकडून मनामनातील राम घराघरात पोहोचविण्याचे काम
Thane NCP
Thane NCPSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane NCP Politics : प्रभू श्रीराम हे मांसाहारी असे वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड नाहक राग ओढवून घेतला आहे. एकीकडे श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहराच्या विविध भागात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आपल्याच आमदार आव्हाडांना कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुमारे आठ हजार झेंडे वाटप करून कळवा परिसर भगवामय केला आहे. दरम्यान, राम मंदिराच्या अडून राष्ट्रवादीनेही नामी शकल लढवत मतांची पेरणी करणाऱ्या राजकीय पक्षांना चपराक दिल्याचे बोलले जात आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यातून त्यांनी आगामी लोकसभेची तयारी, तसेच मतांची पेरणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. यासह 22 जानेवारी रोजीही विविध कार्यक्रमांचे नियोजन आहे. या कार्यक्रमात ठाण्यातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात घेऊनच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या काही स्थानिक मातब्बरांनी नागरिकांच्या मनामनातील 'राम' ओळखला आहे. हा मनातील राम त्यांनी घराघरात पोहचवण्याचे काम हातात घेतले. त्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Thane NCP
Mayor Election : महापौर निवडणुकीत ट्विस्ट, अधिकारीच पडले आजारी; 'ऑपरेशन लोटस फेल'...

अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादीही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पक्षातील कोणी त्यांच्या मंदिरात श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणार आहे. तर कोणी धार्मिक कार्यक्रम करणार आहे. याशिवाय, कोणी नागरिकांच्या मनामनात असलेला श्रीराम ओळखून तो त्यांच्या घराघरात कसा जयश्री राम दिसेल यासाठी झेंड्याचे वाटप करत आहे. हे भगवे झेंडे नागरिकांनी घराबाहेर किंवा बिल्डिंगवर लावले आहेत. अशाप्रकारे आता राष्ट्रवादी पक्षांनी यामध्ये एन्ट्री घेतल्याने हिंदुत्ववादीच्या गप्पा करणाऱ्या ठाण्यातील भाजप आणि शिवसेनेची गोची झाल्याचे दिसत आहे.

Thane NCP
LokSabha Election 2024 : नाना पटोलेंचाही दुजोरा, अमरावतीची जागा काँग्रेसकडेच राहणार!

'मनामनात राम आहे. तेच प्रभू श्रीराम (Ram Temple) घराघरात जावावे, यासाठी झेंडे वाटप संकल्पाना राबवली आहे. यातून झेंडे घराबाहेर लावण्यात आल्याने जवळपास कळवा परिसर भगवामय झाला आहे. तब्बल 8 हजार झेंड्यांचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशाप्रकारे झेंडा वाटप कार्यक्रमाने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कळव्यात या दिवशी आमच्या पक्षातील काही मंडळींनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,' असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मंदार केणी यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 22 जानेवारी अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. तत्पूर्वी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात (Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाडांनी, प्रभू श्रीराम मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप, शिवसेनेच्या वतीने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

एवढेच नाही तर त्यांच्या गुन्हासुद्धा दाखल झाला. त्यानंतर आव्हाडांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचा झेंड्याचे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा भगवा झेंडा हा मध्यम साईजचा असून त्यावर मंदिरांसह प्रभू राम यांचे छापील चित्र आहे. तसेच झेंड्यासह तो लावण्यासाठी काठीही दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Thane NCP
Sanjay Raut : आमच्याविरोधात निकाल देण्यासाठी नार्वेकरांना हा पैसा दिला? अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यावरून राऊत संतप्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com