

Malegaon Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने नाशिक जिल्ह्यात मोठी इनकमिंग मोहिम सुरु केली आहे. भाजपडून आपल्याच मित्रपक्षांना धक्के दिले जात आहे. सिन्ररमध्ये भाजपने राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधात विधानसभेला महाविकास आघाडीकडून उमेदवारी केलेले उदय सांगळे यांना प्रवेश दिला. दिंडोरीत राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना शह देण्यासाठी सुनिता चारोस्कर यांना प्रवेश दिला. आता भाजपने आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवल्याचे दिसते.
भाजप आता मालेगावातही धमाका करण्याच्या तयारीत आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना (शिंदे ) पक्षाचे मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेला दादा भुसे यांच्याविरोधात अपक्ष लढलेले बंडू काका बच्छाव यांना भाजपने गळाला लावल्याचे वृत्त आहे.
बंडू काका बच्छाव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेत दादा भुसे यांना आव्हान दिले होते. मालेगाव बाह्य मध्ये दादा भुसेंना शह देण्यासाठी आता भाजपने बंडू काकांच्या हातात कमळ सोपवण्याची तयारी केली आहे. बंडू काका यांनीही भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहे.
त्याचे झाले असे की, काल बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी बंडू काका बच्छाव हे देखील तिथे उपस्थितीत होते. यावेळी बंडूकाका यांची तेथील उपस्थिती अनेकांच्या नजरेत भरली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
बंडू काका बच्छाव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटी अन चर्चाही झाली आहे. समर्थकांची देखील भाजप प्रवेशाची इच्छा आहे असही बंडू काका यांनी सांगितले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील बंडूकाकांचा २८ नोव्हेंबरला पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगितले.
मालेगावात याआधीही भाजपने काही नेत्यांना गळाला लावलं आहे, त्यामध्ये, काँग्रेसचे नेते तुषार शेवाळे व प्रसाद हिरे समर्थकांसह आधीच भाजपमध्ये आले आहेत. स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने आणखी काही नेते भाजपत जाण्याची शक्यता असून त्यात मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक असलेल्या बंडूकाका बच्छाव यांचाही समावेश आहे. बंडूकाका बच्छाव यांचा भाजप प्रवेश शिवसेना मंत्री दादा भुसे यांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.