Nilesh Rane, Bhaskar Jadhav
Nilesh Rane, Bhaskar JadhavSarkarnama

Chiplun Clash : चिपळूण राडा; हा तर भास्कर जाधवांनी रचलेला मोठा कट..!

BJP District President Kedar Sathe's serious allegation : भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा गंभीर आरोप.
Published on

Chiplun News : लोकसभा निवडणुकांपूर्वीच कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. चार दिवसांपूर्वी चिपळूण येथे भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यात एकमेकांवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आता या सगळ्या राजकीय राड्यानंतर राणे यांच्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावरती गंभीर आरोप केला आहे.

आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर दोन - तीन दिवस आधी पोलिस बंदोबस्त होता आणि असं असतानाही त्यांच्या आवारात शिगा आणि दगड मिळाल्याचा गंभीर आरोप साठे यांनी केला. याबाबत मोठा कट रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर केला आहे.

Nilesh Rane, Bhaskar Jadhav
Chandigarh Mayor Election : सुप्रीम कोर्टाचा भाजपला जोरदार दणका; चंदीगडमध्ये 'आप'चा महापौर बसणारच...

मारलेल्या दगडांचा पुरावाच पत्रकार परिषदेत सादर करत हे दगड रस्त्यावरती कोणी गंमत म्हणून ठेवत नाही. भाजपच्या नेत्याच्या जिवाला त्या दिवशी धोका निर्माण करण्याचा प्लॅन होता, असाही गंभीर आरोप साठे यांनी केला आहे. इतपत काही गंभीर गोष्टी पुढे येत आहेत. प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणजे तुम्ही आमच्या नेत्याच्या जिवावर उठले का? असा सवाल त्यांनी केला.

नीलेश राणे यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते, म्हणूनच काही बरं वाईट झालं नाही; अन्यथा आमचा हा सगळा कट केला गेल्याचा आरोप केला आहे आणि अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही शिगा, दगड आणि हत्यारं जमा करण्याचं काम करत होते. या सगळ्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्यावेळेस स्थानिक लोकप्रतिनिधी आमदाराच्या पायाखालची वाळू सरकते त्यावेळेला त्याच्याकडून अशा प्रकारचे कृत्य होते. आपण गुहागरची सभा मोठी झाली तर संपून जाऊ, या सगळ्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आमदार भास्कर जाधव यांच्याकडून हा सगळा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप साठे यांनी केला आहे.

नीलेश राणेंची सभा होण्याअगोदर जाधव यांनी आपला राणे यांचा संबंध नाही. आपण त्यांची दखल घेणार नाही, वगैरे - वगैरे अशी भाषा केली होती. ज्या वेळेला नीलेश राणे आले त्यावेळेला बॅरिकेडवर चढून जाण्याचा प्रयत्न करत आमदार जाधव कार्यकर्त्यांना चिथावणी देत होते. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे.

आमदार भास्कर चला आता गुहागरला निघायचं ना.. असं रंगात कार्यकर्त्यांना चिथावणी देत आहेत, असा एक व्हिडिओ समोर आल्याची माहिती केदर साठे यांनी दिली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर आमदार जाधव यांच्यावरती पोलिसांकडून कोणती कारवाई होणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत 12 ते 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, तर या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Nilesh Rane, Bhaskar Jadhav
Eknath Shinde News: मुख्यमंत्री शिंदेंची वातावरणनिर्मिती; पण मदार भाजप-राष्ट्रवादीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com