Sanjay Kenekar News : केनेकरांना विधानपरिषदेवर संधी देत भाजपाने संभाजीनगरमध्ये ताकद वाढवली!

BJP enhances its influence in Sambhajinagar with the addition of a new MLA, solidifying its political power in the region. : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंची शिवसेना वरचढ ठरू नये, यासाठी त्यांना वेळीच रोखण्यासाठीच्या रणनितीचा भाग म्हणून केनेकर यांच्या विधान परिषदेवरील संधीकडे पहावे लागेल.
Shivena-BJP News
Shivena-BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्ष फुटीनंतरही भाजपाला मोठा भाऊ होता आलेले नाही. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे निवडून आले आहेत. तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नऊ पैकी शिवसेनेचे सहा तर भाजपाचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडूनही भाजपाला संभाजीनगरात तरी हवे ते मिळवता आलेले नाही.

संजय केनेकर यांना विधान परिषदेवर संधी देत (BJP) भाजपाने जिल्ह्यात एका आमदाराची भर घातली आहे. एक वर्षासाठी का होईना? केनेकर आमदार होणार आहेत. त्यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपाच्या आमदारांची संख्या चार झाली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंची शिवसेना वरचढ ठरू नये, यासाठी त्यांना वेळीच रोखण्यासाठीच्या रणनितीचा भाग म्हणून केनेकर यांच्या विधान परिषदेवरील संधीकडे पहावे लागेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत अतुल सावे यांच्या नावाला कडाडून विरोध करणाऱ्या केनेकर यांना विधान परिषदेवर संधी हा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना धक्का समजला जातो. (Shivsena) विशेषतः राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्यासाठी केनेकर यांची विधान परिषदेवरील निवड आश्चर्याचा धक्का देणारी म्हणावी लागेल. अतुल सावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूक मधील मंत्री आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी सावे यांच्या कामाचे जाहीर कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले होते.

Shivena-BJP News
Sanjay Kenekar News : आमदार होण्याची दोनवेळा हुकलेली संधी अखेर संजय केनेकर यांना मिळालीच!

आता संजय केनेकर यांना विधान परिषदेवर घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या आणखी एका विश्वासू सहकाऱ्याला आमदार केले आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे वाढते वर्चस्व पाहता संजय केनेकर यांना संधी देत त्यांना बळ देऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न दिसतो. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा महापौर करायचा असेल तर शिवसेनेपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. सध्या शहरात शिवसेनेचे दोन, तर भाजपाचा एक आमदार तर जिल्ह्यात शिवसेनेचे चार आणि भाजपाचे दोन आमदार आहेत.

Shivena-BJP News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

शिवसेना मोठा भाऊ..

लोकसभेत एक खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार निवडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिंदेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट खटकत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संपूर्ण तयारी झालेली असताना भाजपाला संभाजीनगरच्या जागेवरील दावा सोडावा लागला होता. भुमरे यांच्या विजयात आमचा मोठा वाटा असल्याचा दावा करत भाजपाने शिवसेनेकडे असलेले पालकमंत्री पद भाजपाच्या अतुल सावे यांना मिळावी, अशी मागणी केली होती.

Shivena-BJP News
ShivSena Holi Festival : ठाकरे अन् शिंदे गट एकत्र; बुरा न मानो होली है!

दरवेळी माघार का घ्यायची? अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली होती. परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत मीठाचा खडा नको, म्हणून स्थानिक नेत्यांना गप्प करत पालकमंत्री पद शिवसेनेलाच दिले. अब्दुल सत्तार हे सहा महिन्यासाठी पालकमंत्री झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा पालकमंत्री पदावर भाजपकडून दावा सांगितला गेला. पण शिंदेंनी संजय शिरसाट यांना पालकमंत्री केले. एकूणच गेल्या अडीच तीन वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाला बॅकफूटवरच राहावे लागले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com