
Chhatrapati Sambhajinagar, 08 February : दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा विजय हा ईव्हीएमचाच विजय आहे. त्यांच्याकडे मतांचीच मशीन आहे, कामाचा विषय आता संपलेला आहे, असा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. तसेच, ईव्हीएम मशीन कायम ठेवून व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीवर आम्हाला शिक्का मारता आला पाहिजे आणि ती आमच्या हाताने मतपेटीत टाकता आली पाहिजे. एवढं केलं आणि भाजप जिंकला, तर त्या जिंकण्याला आम्ही सलाम ठोकू, मानाचा मुजरा करू, असे चॅलेंजही त्यांनी दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनानंतर माध्यमाशी बोलताना माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ईव्हीएमवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मतांची चोरी झाली की दरोडा पडला, हे तपासले पाहिजं. बिगर चोरीचे धनप्राप्ती झाली तर आपल्याला ते मान्य आहे. पण, दरोडा टाकून धनप्राप्ती झाली असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे.
आमची मागणी एकच आहे. ईव्हीएम मशीन आहे, तशीच ठेवा. पण, व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीवर आमची सही करून किंवा शिक्का मारून ती आमच्या हाताने बॉक्समध्ये टाकण्याची परवानगी मिळावी. भारतीय जनता पक्षाने (BJP) जर एवढा विकास केला असेल तर व्हीव्हीपॅटची आमची एक अट मान्य करायला भाजपला काय हरकत आहे. भाजपवाले मान्य करत नाहीत, म्हणजेच ‘दाल में कुछ काला है’, असा आरोपही कडू यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, ईव्हीएम मशीन आहे, तशीच ठेवावी. पण, व्हीव्हीपॅटची चिठ्ठी आमच्या हाती आली पाहिजे. त्यावर आम्हाला शिक्का मारता आला पाहिजे आणि ती आमच्या हाताने मतपेटीत टाकता आली पाहिजे. एवढं केलं आणि मग भारतीय जनता पक्ष जिंकला, तर त्या जिंकण्याला आम्ही सलाम ठोकू, मानाचा मुजरा करू. भारतीय जनता पक्ष विकास करतोय, तर त्यांना भीती कशाची वाटते. माझं मत गेलं कुठं? हे पडताळण्याचा मतदाराला अधिकार आहे. तुम्ही दिलेलं मत संबंधित उमेदवाराला पडलं की नाही पडलं, हेच निवडणूक आयोग दाखवू शकत नाही. संविधानाने दिलेला अधिकारही सध्या आम्हाला दिला जात नाही.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर सांगत होते की, त्यांनी एक पत्र काढलं आहे. मतदान केंद्रात किती लाईट ठेवला पाहिजे, त्याचा प्रकाश किती पडला पाहिजे. ही पत्रकं काढण्यामागचा उद्देश काय? आम्ही आतापर्यंत सोन्या-चांदीचे चोर पाहिले. पण आता मत चोरणारी टोळी निर्माण होते की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे, अशी शंकाही कडूंनी व्यक्त केली.
ते म्हणाले, व्हीव्हीपॅट देता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं. ईव्हीएममधील मतं मोजा; पण आम्हाला शंका आली, तर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यावरून मतं मोजता येतील ना. ते भाजपने आम्हाला सांगितलं पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.