Beed News : बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरला एका भाजप नेत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या मारहाणी प्रकरणी भाजपचे नेते नवनाथ शिराळे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या बीड शहरातील शाखेचे डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद येवले हे ग्राहकाला उद्धट वागणूक देत असून ग्राहकांना सतत त्रास देत आहेत, असा आरोप नवनाथ शिराळे यांनी यावेळी केला आहे.
नेमकं काय घडलं?
डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद गंगाराम येवले हे कामकाज करत असताना नवनाथ शिराळे बँकेच्या कामासंदर्भात बँकेत आले. यावेळी त्यांनी त्यांच्या खात्याचा खाते उतारा बँकेकडे मागितला. यावेळी डेप्युटी मॅनेजर येवले यांनी त्यांना ई-मेल आयडी देण्यास सांगितला. त्यानंतर शिराळे यांनी तो आयडी मराठीत दिला. त्यानंतर ई-मेल आयडी इंग्रजीमध्ये द्या. मराठीत चालत नाही, असं येवलेंनी शिराळेंना सांगितले.
याचाच राग शिराळे यांना आल्याने यांनी डेप्युटी मॅनेजर येवले यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असल्याची तक्रार डेप्युटी मॅनेजर येवले यांनी दिली आहे. या प्रकरणी नवनाथ शिराळे यांच्यासह इतर काही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.