Babajani Durani News : बाबाजानी दुर्राणी अन् त्यांच्या गावगुंडांकडून जि‍विताला धोका, सीईओंचे पोलिस अधिक्षकांना पत्र!

CEO Filed Complaint against Former MLA Babajani Durrani with the Police Superintendent. : या लोकांकडून आपल्यासह अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. दुर्राणी यांच्या प्रवृत्तीची गंभीर दखल घेवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी
Babajani Durrani News
Babajani Durrani NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासोबत नगर परिषद कार्यालयात येवून गुंडगीरी केली. त्याची गंभीर दखल घेवून नगर परिषदेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या जीवीतास वाचवावे, असे पत्र पाथरीचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे. दुर्राणी यांच्या गावगुंडांकडून जि‍विताला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

सोमवारी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani) व त्यांचे 30 ते 40 समर्थक पाथरी नगर परिषदेच्या कार्यालयात घुसले होते. मुख्याधिकाऱ्यांच्या खूर्चीवर बसत त्यांनी सीसीटीव्हीचे केबल तोडून टाकत एकच गोंधळ घातला. कंत्राटी कर्मचारी सदाशिव गायकवाड यांना लाकडी फळीने मारहाण केली. यावर हे गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गाढवावर बसवून धिंड काढण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी नगरपरिषद कार्यालयात गाढवंही आणण्यात आली होती.

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे २ ते ३ तास त्यांच्या गुंडांसोबत नगरपरिषदेत ठाण मांडून बसले होते. यामुळे कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. (Parbhani) अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी तुकाराम कदम यांनी अखेर पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून दुर्राणी आणि त्यांच्या गावगुंडांना रोखून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Babajani Durrani News
Pankaj Bhoyar On Parbhani : फडणवीसांवर गंभीर आरोप, गृहराज्यमंत्री भोयर यांचा गांधींवर पलटवार; म्हणाले, 'काही संघटना महाराष्ट्र अस्थिर...'

या लोकांकडून आपल्यासह अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. दुर्राणी यांच्या कृत्यामुळे नगर परिषद कार्यालयातील संपूर्ण प्रशासन कोलमडले आहे. त्यामुळे माजी आमदार दुर्राणी यांच्या प्रवृत्तीची गंभीर दखल घेवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबा विकास आराखडा समितीमध्ये काम करणार्‍या नगर पालिकेच्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणी यांच्यासह आठ जणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Babajani Durrani News
Trupti Desai : अजितदादांच्या नावाखाली बीडचं पालकत्व कोण संभाळतंय? तृप्ती देसाईंचा पालकमंत्रिपदावरून 'NCP'ला टोला (VIDEO)

याआधी एका माजी नगरसेवकाला माराण केल्याप्रकरणी दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. साईबाबा विकास आराखड्याच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या अलोक चौधरी यांना बाबाजानी व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली होती.

Babajani Durrani News
Ajit Pawar : जयंतरावांसारख्या अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडलेल्या नेत्याकडून 'हे' अपेक्षित नव्हते... अजितदादांचा पलटवार!

घरकुल आणि शाॅपिंग काॅम्पलेक्स मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा चौधरी यांनी बैठकीत काढला होता. त्याचा राग मनात धरून बैठक संपल्यानंतर प्रवेशद्वारावरच बाबाजानी हे अलोक चौधरी यांच्या अंगावर धावून गेले होते. शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात दुर्राणी यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com