Bhokardan Assembly Constituency : राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे पुण्यातील मुलाखतीला `लेट`, संधी हुकणार ?

Chandrakant Danve arrived late for the interview, will he get candidature now? : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी (ता.५) पुणे येथील निसर्ग बंगल्यावर घेण्यात आल्या. भोकरदनसाठी डॉ. सुरेखा लहाने ,केशव जंजाळ, श्रीरंग जंजाळ व रामधन कळंबे यांनी ठरवून दिलेल्या वेळेत मुलाखत दिली.
Bhokardan Assembly Constituency 2024
Bhokardan Assembly Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Jalna NCP (SP) Political News : विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाला वेग आला आहे. पुणे, मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यालयांमध्ये मुलाखतींचा धडाका सुरू आहे. सगळे इच्छुक सगळी कामे सोडून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावत आहे. अशावेळी एखादा इच्छुक पक्षाने बोलावलेल्या मुलाखतीला तीन तास `लेट` जात असेल तर त्याला काय म्हणावे ? आता याची किमंत जर उमदेवारीची संधी गमावून मोजावी लागली, तर ते किती महागात पडेल ?

जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे इच्छुक उमदेवार चंद्रकांत दानवे यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. माजी आमदार आणि विशेष म्हणजे अजित पवार समर्थक अशी ओळख असलेले पण सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेले चंद्रकांत दानवे यांची या लेटलतीफ पणामुळे विधानसभेची संधी हुकते का? याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी (ता.५) पुणे येथील निसर्ग बंगल्यावर घेण्यात आल्या. भोकरदनसाठी डॉ. सुरेखा लहाने ,केशव जंजाळ, श्रीरंग जंजाळ व रामधन कळंबे यांनी ठरवून दिलेल्या वेळेत मुलाखत दिली. पण भोकरदन पॅटर्नसाठी राज्यभरात ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे मात्र मुलाखतीला ऐनवेळी 'लेट' झाले. मुलाखतीला झालेला त्यांचा `लेट मार्क` इतर इच्छुकांच्या जणू पथ्यावरच पडला.

Bhokardan Assembly Constituency 2024
Dhananjay Munde On Sharad Pawar : आम्ही आजही शरद पवारांचा आदर करतो, पण..

मुलाखती दरम्यान चंद्रकांत दानवे यांच्यामुळे मतदारसंघात पक्षाची कशी पिछेहाट झाली याचा पाढाच उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेल्या केशव जंजाळ यांनी नेत्यांसमोर मांडला. (NCP) दुपारी अकरा वाजता सुरू झालेल्या मुलाखतीला चंद्रकांत दानवे तासाभरानंतर पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भोकरदन मतदारसंघासाठी झालेली वेळ संपून परभणी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या होत्या. बेशिस्तपणा मी अजिबात खपवून घेणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोकरदन येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात सुनावले होते.

पण त्याचा विसर चंद्रकांत दानवे यांना पडला की काय? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. दोन दिवस आधी मुलाखतीचे निरोप दिल्यानंतर मुलाखतीला `लेट` कसे झाले याबाबत `सरकारनामा` प्रतिनिधी ने विचारले असता वाहतूक कोंडीमुळे फक्त काही मिनिटांचा उशीर झाला, असे ते म्हणाले. मात्र मी जरी लेट झालेलो असलो तरी मला सर्वाधिक सतरा मिनिटांचा वेळ देण्यात आला व इतरांना फक्त दोन मिनिटे देण्यात आले, असा दावा चंद्रकांत दानवे यांनी केला.

Bhokardan Assembly Constituency 2024
NCP Politics : अजितदादांचा मोठा नेता तुतारी हाती घेणार? सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवल्याचा VIDEO व्हायरल

सर्व्हेमध्ये मला पसंती..

भोकरदन विधानसभा मतदारसंघातील सर्व्हे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वाधिक पसंती मलाच असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांनी इतरांच्या तुलनेत मला पसंती दिल्याचे चंद्रकांत दानवे सांगतात. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याची अफवा त्यांच्याच समर्थकांनी मतदार संघात पसरवली. चंद्रकांत दानवे यांना राष्ट्रवादीमध्ये 2009 पासून विरोध होत आहे. तेव्हा त्यांच्या विरोधात डझनभर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रारी करून उमेदवारी मागितली होती.

मात्र शरद पवार यांनी भोकरदन चा निर्णय दिवंगत नेते अंकुशराव टोपे यांच्यावर सोपवला व चंद्रकांत दानवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांचा सोळाशे मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चंद्रकांत दानवे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून चंद्रकांत दानवे यांची मोठी अडचण झाली. स्थानिक पातळीवर त्यांना रावसाहेब दानवे विरोधी चेहरा म्हणून ओळखले जात होते.

Bhokardan Assembly Constituency 2024
Ajit Pawar : 'विरोधक काहीही बोलतात', दिवाळखोरीच्या आरोपावर अजितदादांनी सुनावले

दुसरीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण सूत्रे ही राजेश टोपे यांच्याकडे गेल्यामुळे सुरेखा लहाने, केशव जंजाळ व राष्ट्रवादीतील इतर नेत्यांना टोपे यांनी बळ देणे सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षभरापूर्वी जाफराबादच्या नगराध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या निवासस्थानी भेट देऊन केलेली चर्चा, मराठा मोर्चा वरून भोकरदन तालुक्यातील ढवळून निघालेले राजकारण यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेमके कुठले धक्का तंत्र वापरते ? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यंदा मात्र माजी मंत्री राजेश टोपे यांच्या भूमिकेवर भोकरदनची उमेदवारी ठरणार, असे चित्र आहे. आता ते आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात? यावर तुतारी कोण वाजवणार? हे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com