Chandrakant khaire Allegation On Bjp : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपचा राज्यात दंगली घडवण्याचा प्लॅन..

Marathwda : आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना कुठेही जातीय दंगली झाल्या नव्हत्या.
Chandrakant khaire Allegation On Bjp
Chandrakant khaire Allegation On BjpSarkarnama

Shivsena : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर (Bjp) भाजप बिथरला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जातीय दंगली घडवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा आणि आता अकोला, शेवगाव येथे उसळलेला हिंसाचार हा देखील भाजपच्या प्लानचाच भाग असल्याचा दावा देखील खैरे यांनी केला.

Chandrakant khaire Allegation On Bjp
Devendra Fadnavis on Shevgaon Violence : शेवगाव येथील राड्यानंतर गृहमंत्री फडणवीस 'अॅक्शन मोड'मध्ये, दिला 'हा' गंभीर इशारा

महाविकास आघाडी (bjp) सरकारला राज्यातील जनतेची पसंती मिळत असल्यामुळेच भाजपचा हा सगळा खटाटोप सुरू असल्याचेही (Chandrakant Khaire) खैरे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलन पार पडले. यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थितीत होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थतीत होते.

दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीची देखील महत्वाची बैठक काल पार पडली. भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू असतांनाच आता चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अकोला आणि त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर खैरे यांनी हे आरोप केले आहेत. खैरे म्हणाले, राज्यातील जनतेची पसंती ही महाविकास आघाडीलाच आहे, हे नुकत्याच झालेल्या बाजार समितीत दिसून आले.

या शिवाय कर्नाटक सारखे दक्षिणेतील महत्वाचे राज्य देखील भाजपच्या हातून गेले. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तिथे काॅंग्रेसची बहुमताने सत्ता आली. त्यामुळे बिथरलेल्या भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्लॅन आखला आहे. शहरातील किराडपुरा भागात घडलेली दंगल हा त्याचाच भाग होता. नामांतराला विरोध करण्यासाठी भाजपनेच खासदार इम्तियाज जलील यांना आंदोलन करायला लावले होते. त्याचाच परिणाम किराडपुऱ्यातील दंगलीच्या रुपात झाला.

आता अकोला आणि शेवगावमध्ये देखील अशाच प्रकारे जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतांना राज्यात जातीय दंगली घडत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना कुठेही जातीय दंगली झाल्या नव्हत्या. पण राज्यातील सत्तातंरानंतर मुस्लिम मतदार जसा महाविकास आघाडीकडे वळू लागला तशा राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली घडू लागल्या याकडेही खैरे यांनी लक्ष वेधले.

Chandrakant khaire Allegation On Bjp
Ajit Pawarच्या जवळचा Ex MLA जाणार BJPत | Ashok Tekawade | Purandar | NCP | Sarkarnama

भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली असून पुढील एक महिना सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावाही खैरे यांनी केला. मुस्लिम समाजाची मते महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे यांना मिळू नये, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, शिवाय वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आल्याने भाजप बिथरला आहे. म्हणून त्यांच्या आता चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com