Shivsena UBT News : हात जोडून, दंडवत घालूनही ऐकले नाही; चंद्रकांत खैरे म्हणतात, बरं झालं गेले आता नव्यांना संधी देऊ!

Chandrakant Khaire expresses anger over former corporators leaving the party. Read more about the political tensions in the local leadership. : एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील आभार यात्रेची वाट न पाहता प्रदीप जयस्वाल यांनी या सगळ्या माजी नगरसेवकांना मुंबईत नेऊन त्यांचा पक्षात प्रवेश करवून घेतला.
Chandrakant Khaire News
Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Khaire News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेली गळती रोखण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले. अखेर पक्षाच्या दहा माजी नगरसवेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाच. यामध्ये खैरे आणि दानवे समर्थक अशा दोन्ही नगरसेवकांचा समावेश होता. हात जोडून, दंडवत घालूनही माजी नगरसेवकांनी न ऐकल्याने खैरे चांगलेच संतापले आहे.

बर झालं गेले, त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे हे लवकरच त्यांना कळेल. महापालिका निवडणुकीसाठी पक्षात स्पर्धा असताना आता जे गद्दार झाले त्यांना तिकीटं दिली. पक्षात विविध पदं दिली, पण शेवटी ते गद्दारच निघाले. लवकरच त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येईल. आम्ही मात्र नव्याने पक्ष बांधणी करू, ज्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही, अशा नव्या लोकांना निवडणुकीत संधी देऊ, असे (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या (Shivsena) दहा माजी नगरसेवकांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात खैरे यांनी शिवसैनिकांसमोर साष्टांग दंडवत घालत कोणीही पक्ष सोडून जाऊ नका, असे आवाहन केले होते. पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, अशी साद त्यांनी घातली होती.

Chandrakant Khaire News
Shivsena UBT : ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून ठाकरेंच्या खासदारांनी एकत्र येत शिंदे गटाला ठणकावलं, "टायगर जिंदा है..."

तर दुसरीकडे हे सगळे माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात लवकर प्रवेश व्हावा, यासाठी प्रयत्न करत होते. शिंदे गटातही या माजी नगरसेवकांच्या प्रवेशावरून वादावादी होती हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांना डावलून या सगळ्यांचा प्रवेश एकनाथ शिंदे यांना संभाजीनगरमध्ये आणून करण्याचा पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा प्रयत्न होता. परंतु ज्या मध्य मतदारसंघातील हे सगळे माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रवेश मीच करवून घेणार, अशी भूमिका जयस्वाल यांनी घेतली होती.

Chandrakant Khaire News
BJP Vs Shivsena : शिंदेसेनेच्या 'या' मंत्र्यानं फडणवीसांविरोधात थोपाटले दंड; म्हणाले, 'अंतिम निर्णय माझाच...'

एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील आभार यात्रेची वाट न पाहता प्रदीप जयस्वाल यांनी या सगळ्या माजी नगरसेवकांना मुंबईत नेऊन त्यांचा पक्षात प्रवेश करवून घेतला. संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ हे जिल्ह्यातील दोघेही यावेळी हजर नव्हते. यावरून या माजी नगरसेवकांच्या प्रवेशावरून पक्षात धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले. संजय शिरसाट यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे आपण या प्रवेश सोहळ्यासाठी गेलो नसल्याचे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Chandrakant Khaire News
Municipal Corporation News : भाजपकडून स्वबळावर जोर, शिवसेनेला मात्र एमआयएमची भिती!

दुसरीकडे शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या 'शिवबंधन' कार्य अहवालाचे प्रकाशन मुंबईत सुरु असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील या माजी नगरसेवकांनी आपल्या हातातील शिवबंधन सोडले आणि शिंदे गटात प्रवेश केला. अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केले नसले, तरी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांना त्यांचे भविष्य तिकडे अंधकारमय असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com